Kolhapur News : बाजार समितीत शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास, तसेच निवासाची सुविधा देणार असल्याची माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी दिली. .कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री. पाटील बोलत होते. ‘‘बाजार समितीत आजवर वार्षिक १९ कोटी रुपये कर जमा होत होता. यापुढील काळात २५ कोटी रुपयांचे करसंकलन करण्याचे उद्दिष्ट समिती यंत्रणेला दिले आहे. या माध्यमातून बाजार समितीत उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देणारी, देशातील पंचतारांकित बाजार समिती बनवू,’’ असे आश्वासन श्री. पाटील यांनी दिले..Barshi APMC : बार्शी बाजार समितीच्या अंतिम मतदार यादीत ५२५८ नावे.ते म्हणाले, ‘‘बाजार समितीत सौरऊर्जेचा वापर सुरू झाला आहे. ६५ किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरओ प्लांट उभारला आहे. गेट क्रमांक ४ ते ७ पर्यंत रस्त्यासह अन्य तीन रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. समितीच्या उत्पन्नातून यावर्षी ८७ लाख रुपयांच्या मुदतठेवी ठेवण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण १९ कोटी ३० लाख रुपयांच्या मुदतठेवी बाजार समितीकडे आहेत.’’.शेतकऱ्यांनी गूळ उत्पादनात घट, साखरमिश्रित गूळ, जीआय नामांकनाचा फारसा लाभ होत नसल्यासंबंधी प्रश्न उपस्थित केले. भाजी विक्रेते फिरोज बागवान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बाजार समितीत उभारण्याची मागणी केली. आवारातील पुतळ्यांची स्वच्छता व उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या..Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध .‘‘कोल्हापुरात १२० गुऱ्हाळघरे आहेत. गूळ उत्पादन वाढावे, जीआय नामांकनानुसार दर्जेदार गूळ तयार व्हावा व त्याला चांगला भाव मिळावा यासाठी बाजार समिती कार्यशाळा घेणार आहे. गुळाबाबत संचालक पी. डी. पाटील मार्गदर्शन करतील..गुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारली जाणार असून, चेन्नई येथील प्रयोगशाळेचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे,’’ असे त्यांनी सांगितले, बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी यांनी अहवालवाचन केले. उपसभापती राजाराम चव्हाण यांनी आभार मानले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.