Rabi Season: रब्बी हंगामात कडधान्य लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत मसूर पीक मिनी किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १६ किलो मसूर बियाणे मोफत मिळणार असून, त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे..दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यात येणाऱ्या कडधान्य पिकांच्या लागवडीला प्राधान्य देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे. हरभरा, तूर, उडीद आणि मसूर यांसारख्या पिकांच्या लागवडीतून पीक विविधीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रब्बी हंगामात मसूर पीक मिनी किटचे वितरण केले जाणार आहे..Rabi Jowar Cultivation: रब्बी पेरण्यांबाबत अनिश्चितता; ज्वारी बियाण्याच्या मिनीकिटचे वाटप होणार.या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १६ किलो वजनाचा मसूर बियाणे संच पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे मसूर लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे खरेदीवरील खर्च वाचविण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. .Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग.पोर्टलवर उपलब्ध सूचनांनुसार आवश्यक माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करूनही पोर्टलवर प्रवेश करता येणार आहे. मसूर हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक असून, त्याच्या लागवडीमुळे कडधान्य उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..प्रथम येणाऱ्यास प्राधान्यमसूर बियाणे मिनी किटचे वितरण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध बियाणे संचांची संख्या लक्षात घेता पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.