थोडक्यात माहिती..१. रब्बी ज्वारी पेरणी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करावी.२. हलकी, मध्यम व भारी जमिनीसाठी वेगवेगळे वाण उपलब्ध आहेत.३. कीड-रोग प्रतिकारक सुधारित व संकरित वाण वापरल्यास उत्पादन जास्त मिळते.४. परभणी मोती, फुले सुचित्रा, फुले वसुधा यांसारखे वाण जास्त लोकप्रिय आहेत.५. योग्य पूर्वमशागत आणि खत व्यवस्थापनामुळे उत्पादनात ३०-३५% वाढ होते..Jowar Varieties: सप्टेंबर महिना सुरु झाल्यावर राज्यातील अनेक भागांमध्ये रब्बी पिकांच्या पेरणीला, मशागतीला सुरुवात व्हायला लागते. ज्वारी हे राज्यातील महत्त्वाचे पीक आहे. मुख्यत: धान्य आणि कडबा यांसाठी ज्वारीची पेरणी केली जाते. ज्वारीच्या पेरणीसाठी पूर्वमशागत आणि जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित- संकरित आणि कीड-रोग प्रतिकारक वाणांची पेरणी करुन शेतकरी ज्वारीचे चांगले उत्पादन मिळवू शकतात. .जमीन रब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात जिरायती भागामध्ये केली जाते. मध्यम ते भारी जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी. कारण या जमिनीत ओल जास्त काळ टिकवून राहते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.५ असावा. शिवाय जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन मिळवण्यासाठी योग्य वाणांची निवड करावी..पूर्व मशागतशेतांमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी मशागत करावी. पेरणीपूर्वी जेवढा पाऊस पडेल तेवढा जिरवावा. नांगरट झाल्यानंतर हेक्टरी ५ ते ६ टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.त्यानंतर कुळवाच्या पाळ्या देऊन शेतातील काडीकचरा आणि धसकटे वेचून शेत साफ करुन घ्यावे. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीच्या उतारावर ३.६० * ३.६० चौ.मी. आकाराचे वाफे तयार करावेत. वाफे तयार करताना सारा यंत्राने सारे करुन त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात. पेरणीपूर्वी दीड महिना वाफे आधी तयार करण्याची शिफारस केली जाते..Jowar Cultivation: जास्त उत्पादनासाठी रब्बी ज्वारी लागवड तंत्र .रब्बी ज्वारीची पेरणी कोरडवाहू भागामध्ये १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या एक महिन्यात करावी. पेरणीच्या वेळी वाफे मोडून पेरणी करावी. सारा यंत्राच्या सहाय्याने गहू, हरभरा पिकासारखे वाफे पाडून आडवे दंड (समान आकाराचे बांध) पाडावेत. यामुळे पेरणीनंतर पाऊस पडल्यावर तो अडवून जिरवता येईल. त्यामुळे रब्बी ज्वारीच्या उत्पादनात ३० ते ३५ टक्के वाढ होते..रब्बी ज्वारीसाठी सुधारित वाण-कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेले सुधारित किंवा संकरित वाण जमिनीच्या प्रकारानुसार वापरावे.१. हलकी जमीन (३० सें.मी.पर्यंत खोली)- फुले अनुराधा, फुले माऊली, फुले यशोमती२. मध्यम जमीन (६० सें.मी.पर्यंत खोली) फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी-३५-१३. भारी जमीन (६० सें.मी.पेक्षा जास्त खोली) सुधारित वाण फुले पुर्वा, फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही.-२२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती, परभणी सुपर मोतीसंकरित वाण:(Hybrid) सी. एस. एच. १५ आणि सी. एस. एच. १९, परभणी शक्ती.४. बागायतीसाठी वाण- फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही. १८, सी. एस. एच. १५ व सी. एस. एच. १९ ५. हुरड्यासाठी वाण- फुले उत्तरा, फुले मधुर ६. लाह्यांसाठी वाण- फुले पंचमी७. पापडासाठी वाण- फुले रोहीणी .कीड- रोग प्रतिकारक्षमफुले यशोमती- खोडमाशी प्रतिकारकफुले सुचित्रा- खोडमाशी, खोडकीड आणि पानांवरील रोगांसाठी प्रतिकारकपरभणी ज्योती- मावा किडीस प्रतिकारक्षमफुले रेवती- खोडमाशी प्रतिकारक.वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):1. रब्बी ज्वारी पेरणीसाठी योग्य काळ कोणता आहे?१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा कालावधी सर्वात योग्य आहे.2. ज्वारीसाठी कोणती जमीन उत्तम असते?मध्यम ते भारी जमीन रब्बी ज्वारीसाठी चांगली असते, कारण ती ओल टिकवते.3. कीड-रोग प्रतिकारक रब्बी ज्वारी वाण कोणते आहेत?फुले सुचित्रा, फुले यशोमती, फुले रेवती आणि परभणी ज्योती हे वाण प्रतिकारक्षम आहेत.4. सर्वाधिक उत्पादन देणारे ज्वारी वाण कोणते?परभणी मोती, फुले सुचित्रा, फुले वसुधा आणि पीकेव्ही क्रांती हे वाण जास्त उत्पादन देतात.5. रब्बी ज्वारी उत्पादनात वाढ करण्यासाठी काय करावे?योग्य वाण निवडणे, पूर्वमशागत करणे आणि खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनात ३०-३५% वाढ होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.