Potato Varietiesदेशातील बटाटा उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने नुकतीच बटाट्याच्या चार नवीन वाणांना अधिकृतपणे मंजुरी दिली. आयसीएआर (ICAR)- केंद्रीय बटाटा संशोधन संस्था (CPRI), सिमला यांनी ही नवीन वाण विकसित केली आहेत. कुफरी रतन, कुफरी तेजस, कुफरी चिपभारत-१ आणि कुफरी चिपभारत-२ अशी त्यांची नावे आहेत..केंद्रीय बियाणे समितीच्या शिफारशींनुसार, अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील कृषी उत्पादनासाठी, बियाणांचे उत्पादन आणि त्याच्या वाढीसाठी तसेच औद्योगिक प्रक्रियेसाठी ही नवीन वाण जारी केली आहेत..Rabi Jowar: जास्त उत्पादन देणारे रब्बी ज्वारीचे सर्वोत्तम वाण.नव्याने विकसित केलेली वाण ही घरगुती वापरासाठी आणि औद्योगिक प्रक्रियेची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे. त्याचबरोबर भरघोस उत्पादन, हवामान सहनशील आणि शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्याची खात्री देणारी ही नवीन वाण आहेत..कुफरी रतनकुफरी रतन हे मध्यम-परिपक्वता असलेले वाण आहे. त्याचा पीक कालावधी सुमारे ९० दिवसांचा आहे. हे वाण उत्तर भारतीय मैदानी भाग आणि पठारी प्रदेशात उत्पादन घेण्यासाठी अनुकूल असे आहे. याची उत्पादन क्षमता प्रति हेक्टर ३७ ते ३९ टन एवढी आहे. याची साल गडद लाल रंगाची असते. याची अधिक दिवस टिकून राहण्याची क्षमता चांगली आहे. यामुळे हे वाण शेतकरी आणि बाजारातील पुरवठा साखळींसाठी योग्य असे आहे..Cotton Farming: कपाशीत वाण निवडीला प्राधान्य.कुफरी तेजसहे मध्यम-परिपक्वता असणारे वाण आहे. हे उष्णता सहनशील असे आहे. याची उत्पादन क्षमता प्रति हेक्टर ३७ ते ४० टन एवढी आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यासारख्या राज्यांमध्ये पूर्व हंगामी लागवड तसेच मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये मुख्य हंगामात लागवड करण्यासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे..कुफरी चिपभारत-१हे मध्यम परिपक्वता म्हणजे १०० दिवसांत काढणीला येणारे वाण आहे. याची उत्पादन क्षमता प्रति हेक्टर ३५ ते ३८ टन एवढी आहे. मुख्य हंगामात हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू आदी राज्यातील मैदानी प्रदेशांत लागवडीसाठी याची शिफारस करण्यात आली आहे. याची साठवण क्षमता खूप चांगली आहे. यात साखरेचे प्रमाण कमी असते..कुफरी चिपभारत-२हे लवकर परिपक्व होणारे वाण आहे. हे सुमारे ९० दिवसांत काढणीला येते. याची उत्पादन क्षमता प्रति हेक्टर ३५ ते ३७ टन आहे. हे हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू आदी राज्यांमध्ये उत्पादन घेण्याचे विकसित करण्यात आले आहे. चिपभारतच्या दोन्ही वाणांना बटाटा बियाणे उत्पादक आणि प्रक्रिया उद्योगांसाठी परवाना मिळणार आहे. यामुळे खाद्य उद्योगासाठी उच्च-दर्जाच्या कच्च्या मालाच्या सातत्याने पुरवठा होऊन ते फायदेशीर ठरणारे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.