Amaravati News : पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थी संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्याच्या यादीत १ लाख ११ हजार १४१ लाभार्थ्यांची भर पडली. गत चार महिन्यांपासून सुरू असलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता ज्या लाभार्थ्यांनी मोबाइलद्वारे सर्वेक्षण केले त्यांची पडताळणी नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांमार्फत सुरू करण्यात आली आहे..जिल्ह्यात घरकुल मिळण्याकरिता २०१८ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणात लाभार्थी समाविष्ट झाले असले तरी बहुतांश लाभार्थी पात्र असताना सुटल्याची देखील ओरड झाली. दरम्यान, कित्येक लाभार्थ्यांनी घरकुलाकरिता मागणी केली. परंतु, त्यांचे नाव यादीत नसल्याने त्यांना घरकुल देणे प्रशासनाकडून अशक्य होते. .Rural Housing Scheme : स्वामी चिंचोली येथील घरकुले प्रगतीपथावर.त्यामुळे वंचित लाभार्थ्यांमध्ये रोष व्यक्त होत असताना शासनाकडून यादीतून सुटलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता अशा पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होती. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १ लाख ११ हजार १४१ सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत..Rural Housing Scheme : घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीत दिरंगाई नको ः प्रकाश आबिटकर.यामध्ये ३९ हजार ३०१ स्वयंसर्वेक्षण तर ७१ हजार ८४० साहाय्यित सर्वेक्षणांचा समावेश आहे. सर्वाधिक सर्वेक्षण धारणी तालुक्यात पार पडले असून येथे एकूण १२,०३४ सर्वेक्षणे करण्यात आली. त्यापाठोपाठ चांदूरबाजार (१०,१५७) व धामणगावरेल्वे (९,४९६) या तालुक्यांचा समावेश आहे. .दरम्यान, भातकुली (८,७३३), दर्यापूर (८,९४५), अचलपूर (९,३०७) या तालुक्यांमध्येदेखील सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अमरावती तालुक्यात ८,०२५ तर अंजनगावसुर्जीत ७,७१४ लाभार्थी वाढले आहेत. यामध्ये ३९ हजार ३०१ लाभार्थ्यांनी स्वतः मोबाइलद्वारे सर्वेक्षण केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.