Pune News: हस्तलिखित सातबारा उताऱ्यातील दोष दुरुस्तीच्या नावाखाली महसूल अधिनियमाच्या कलम १५५ चा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे उघडकीस आले आहे. पुणे जिल्ह्यातील मागील पाच वर्षांमधील (२०२० पासून) सुमारे ३८ हजार आदेशांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी तब्बल ४ हजार ५०८ प्रकरणे संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले आहे..या प्रकरणांतील फायली नाशिक विभागीय आयुक्तांना संशयास्पद आढळल्या असून, त्याचा सविस्तर अहवाल लवकरच राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. या प्रकरणात गंभीर अनियमितता आढळलेल्या आदेशांबाबत संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे..Land Records: जुन्या जमीन दस्तांचे डिजिटायझेशन होणार; ६२ कोटींचा प्रकल्प.संगणकीकरणातील ‘लेखन प्रमाद’चा गैरफायदासातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना झालेल्या लेखन प्रमादाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी महसूल अधिनियमाच्या कलम १५५ नुसार तहसीलदार व अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र या अधिकारांचा गैरवापर करत अनेक ठिकाणी केवळ तांत्रिक चुका नव्हे,.Land Acquisition Right: अधिग्रहित जमिनीवरील हक्क अबाधित न ठेवल्यास आंदोलन.तर हस्तलिखित सातबाऱ्यांमधील नावे बदलणे, क्षेत्रफळात फेरफार करणे, नवीन शर्तीचे शेरे घालणे, कुळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारी पड जमिनींबाबतच्या नोंदी, तसेच वारसांच्या वैध व कायदेशीर नोंदी दुरुस्त केल्याचे आढळून आले आहे. या प्रकारांमुळे सामान्य नागरिकांना दुरुस्तीसाठी वारंवार महसूल कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या..तक्रारीनंतर सरकारकडून चौकशीया संदर्भात राज्य सरकारकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याने, राज्य सरकारने नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन केली.या समितीला २०२० पासून आजपर्यंत काढण्यात आलेल्या आदेशांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. समितीच्या आदेशानुसार महसूल अधिनियमाच्या कलम १५५, १८२, २२० आणि २५७ अंतर्गत घेण्यात आलेल्या गावनिहाय आदेशांची यादी जिल्हा प्रशासनाने तयार केली..प्रवीण गेडाम समितीने घेतलेला धांडोळाकलम तपासणीत आढळलेल्या नोंदी समितीला संशयास्पद आढळलेली प्रकरणेकलम १५५ (लेखन प्रमाद दुरुस्ती) ३७,९६८ ४,५०८कलम २५७ (फेरफार दुरुस्तीसाठी पुनरिक्षण अर्ज) ५४ ४२कलम १८२ (आकारी पड जमिनींच्या शेतसाऱ्याबाबत) ३ ३कलम २२० (आकारी पड जमीन पुनःवितरण) २ २एकूण ३८,०२७ ४,५५५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.