Shivraj Patil Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान, लातूर येथील निवासस्थानी आज शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. .शिवराज पाटील लातूर लोकसभा मतदारसंघातून सातवेळा निवडून आले होते. लोकसभेचे अध्यक्ष आणि केंद्रात त्यांनी गृह, संरक्षण अशी महत्त्वाची पदे भूषविली होती. .त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. ''ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरजी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रात गृह, संरक्षण खात्याचे मंत्री, राज्यपाल अशा विविध भूमिकांमधून काम करताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेशी निगडित अनेक अभिनव उपक्रमांना चालना दिली. तत्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व म्हणून त्यांना देशाच्या राजकारणात आदराचे स्थान होते. त्यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे..Political Debate: काँग्रेस पक्ष आता अति डाव्या विचारांकडे झुकला.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. .Solapur APMC Election : ‘काँग्रेस बिना भाजप अधुरा’चा प्रत्यय .शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला होता. साधेपणा आणि नैतिक मूल्यांचे ते प्रतीक होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी विविध पदं भूषवत असताना त्यांनी राजकारणातील नैतिकता कायम जपली. लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले. भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील, असे अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.