Nashik News: पेठ-हरसूल वनपरिक्षेत्रातील रायता परिसरात वन विकास महामंडळाच्या दक्षता पथकाने मोठी कारवाई करत खैर लाकडांची तस्करी उधळून लावली आहे. महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमेलगत ओझरखेड आणि सूलिया गावांच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. .या धाडीत तस्करीसाठी वापरण्यात आलेले स्कॉर्पिओ वाहन आणि खैराचे लाकूड जप्त करण्यात आले असून, तस्कर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वनपथकाने संशयित वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये खैराचे ६ नग (०.०८७ घनमीटर) आढळून आले..Khair Wood Smuggling : वन विकास महामंडळाची गुजरातेत कारवाई .ही वनउपज आणि वाहन वन विकास महामंडळाने तातडीने जप्त केले आहे. याप्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) (इ), (ड), (फ) तसेच कलम ५२(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..प्राथमिक तपसात एकूण पाच संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यापैकी तीन आरोपी गुजरात राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. कारवाई वन विकासचे नाशिक प्रादेशिक व्यवस्थापक उमेश वावरे, विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे व सहाय्यक व्यवस्थापक प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.