Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनाळी (ता.वैभववाडी) येथे वनविभागाने राबविलेल्या माकड पकड मोहिमेत आठ माकडांना पकडण्यात यश आले आहे. दोन दिवस माकडांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. दरम्यान, ही माकडे मंगळवारी (ता.१३) सायकांळी उशिरा नैसर्गिक अधिवासात हलविण्यात सोडण्यात आली..जिल्ह्यात सर्वत्र वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला आह. यामध्ये हत्ती, गवे आणि माकडांचा अधिक उपद्रव सुरू आहे. हत्ती आणि गव्यांकडून फळबागांचे मोठे नुकसान सुरू आहे. याशिवाय वस्तीपासून दूर असलेली बांबू लागवड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. .Monkey Fruit Benefits : 'या' फळाच्या सेवनाने यकृताशी संबंधित आजारचा धोका होतो कमी .तर दुसरीकडे माकडांमुळे भाजीपाला, कडधान्य लागवड करणे शेतकऱ्यांनी बंद केली आहे. डोळ्यादेखत माकडे शेतीचे नुकसान करीत आहेत. नारळ, सुपारीचे प्रचंड नुकसान माकडे करीत आहेत. घरात घुसून नुकसान करण्याचे प्रकार वाढत आहेत. सोनाळी गावातही गेल्या काही दिवसांपासून माकडांचा उपद्रव वाढला होता. .Samrudhha Panchayatraj Campaign : एकरकमी थकीत कर भरल्यास ५० टक्के माफी.त्यामुळे गावातील संतोष सीताराम रावराणे यांनी शासनाच्या ‘आपलं सरकार महा-ऑनलाइन’ या पोर्टलवर माकडांच्या उपद्रवाबाबत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची वन विभागाने दखल घेत गेल्या दोन तीन दिवसांपासून सोनाळीत माकड पकड मोहीम राबविण्यास सुरुवात केली होती.वनविभागाचे वनपाल हरी लाड, वन अधिकारी एस.डी.राख आणि प्रशिक्षित कत्रांटी कामगारांनीएकत्रितपणे माकड पकडण्यासाठी सापळा लावला होता..दरम्यान, दोन दिवसांत आठ माकडे या सापळ्यात सापडली आहेत. या माकडांना मंगळवारी सायकांळी उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.