Chandrapur News : वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने मागील वर्षी मुरडा उपवन क्षेत्रात गवत बी संकलन आणि विक्री केंद्र सुरू केले. जंगलातील वेगवेगळ्या प्रजातींच्या गवताची लागवड करण्यात आली. यंदा या गवताच्या बियांना अनेक राज्यांतून मोठी मागणी झाली. या बिया विक्रीतून वनविभागाला तब्बल दहा लाखांचा नफा मिळाला आहे..वरोरा परिसरातील जंगलातून लहू मारवेल, धामण, रानमेथी, मदनअंजन यांसह अन्य ३२ प्रजातींचे गवत गोळा करण्यात आले. या गवतांमधून २४८ किलो गवताच्या बिया गोळा करण्यात आल्या. सारिका टायगर रिझर्व्ह राजस्थान, कांजीरंग अभयारण्य आसाम, तमिळनाडू सत्यमंगलम अभयारण्य, पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि अकोला या ठिकाणांहून गवत बियांची मागणी आली. .Grass Conservation: गवताळ प्रदेशांचे संवर्धन आवश्यक.वन विभागाने त्याचा पुरवठाही त्यांना केला. त्यामधून वनविभागास दहा लाख रुपये प्राप्त झाले. गवतामधून बिया काढल्यानंतर वाळलेले गवत शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांकरिता मोफत देण्यात येत आहे. गवत बियांमधून विक्रीची आलेली रक्कम वनविकास समितीला देण्यात येणार आहे.Carrot Grass Control: गाजर गवताच्या निर्मूलनासाठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता.अनेकांना रोजगारशेतीचा हंगाम संपल्यानंतर शेतकरी, मजुरांच्या हाताला कामे नसतात. उन्हाळ्याच्या दिवसांत मोहफूल, तेंदूपत्ता संकलनाचे काम चालते. त्यातून चार पैसे मजुरांच्या हाती पडतात. मुरडा उपवन क्षेत्रात गवत बी संकलन आणि विक्री केंद्राने परिसरातील नागरिकांना रोजगार मिळाला आहे. गवत गोळा करणे आणि त्यातून बिया काढण्याच्या कामाने या भागातील नागरिकांना रोजगार मिळाला आहे. तसेच वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात खाद्य मिळाल्यास ते जंगलाबाहेर येणार नाहीत..मागील हंगामात देशातील पहिला गवत बी संकलन प्रकल्प सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. इतर राज्यांतूनही मागणी आली. पुढीलवर्षी हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविणार आहोत- सतीश शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.