Satara News: मानवी वस्तींमध्ये बिबट्यांचा वावर वाढत आहे. हा वावर कमी करण्यासाठी वन विभागाने व वन्यजीव विभागाने उपाययोजना कराव्यात. मानवी वस्तीत बिबट्या आढळल्यास घाबरुन न जाता नागरिकांनी तात्काळ वन व वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले..पालकमंत्री कार्यालयात मानवी वस्तीत बिबट्याचा वावर यावर करावयाच्या उपायोजनांसदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे आदी उपस्थित होते. .Leopard Sighting: गिरड परिसरात बिबट्याचा वावर.वन विभागाने बिबट्यांपासून संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्या गावांमध्ये बिबटे आढळले आहेत त्या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व वन विभाग कर्मचारी यांनी मार्गदर्शक उपाययोजनांची जनजागृती करावी व प्रशासन करीत असलेल्या सूचनांची माहिती द्यावी..Leopard Protection: बिबट्यांसाठी मालेगावला राखीव वनक्षेत्रासाठी साकडे.चांदोली अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये बिबटे पकडण्यासाठी जास्तीचे पिंजरे लावावेत व त्या ठिकाणी प्राधान्याने ड्रोन कॅमेराचा वापर करावा. . बिबट्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी वन विभागाचा चर खांदण्याचा जुना कार्यक्रम होता. त्या पद्धतीने बिबट्यांचा वावर असणाऱ्या गावांच्या कडेला चर खांदण्यात यावी. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.