Dharashiva News: घाटपिंपरी (ता. वाशी) येथे जगदाळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विशेष श्रमशिबिराच्या माध्यमातून उल्लेखनीय सामाजिक उपक्रम राबवले. श्रमशिबिरादरम्यान वनराई बंधारा उभारणी, स्वच्छता मोहिमेसह विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली. प्राचार्य डॉ. अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले..शिबिराच्या कालावधीत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर घेऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली..Vanrai Bandhara: विद्यार्थ्यांकडून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम.तसेच शेतीविषयक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान, महिला मेळाव्यातून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम व एकपात्री नाटकाच्या माध्यमातून ग्रामस्थांचे मनोरंजन करताना अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देण्यात आले..Vanrai Bandhara : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ३२० बंधारे बांधून पूर्ण.समारोप कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ. कदम, बाळासाहेब मांगले, शंकर आहिरे, चंद्रकांत सातपुते, जयचंद सातपुते,.कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनंत पाटील, प्रा. डॉ. दैवशाला रसाळ, महादेव भैरट, प्रा. श्यामसुंदर डोके, प्रा. डॉ. नेताजी देसाई आदींची उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.