ठळक मुद्देकेंद्राने गहू निर्यातीला तूर्त परवानगी देण्याची मागणी फेटाळून लावली आहेगहू उत्पादनांच्या निर्यातीला परवानगी देण्याची सध्यातरी कोणतीही योजना नाहीकेंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केली भूमिका .Wheat Export : गहू निर्यातीबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत बुधवारी बोलताना, गहू निर्यातीला परवानगी देण्याची मागणी फेटाळून लावली. त्यांनी सांगितले की, पुढील वर्षी नवीन पीक आल्यानंतरच त्याचे मूल्यांकन होईल. गहू उत्पादनांच्या निर्यातीला परवानगी देण्याची सध्यातरी अशी कोणतीही योजना नाही..नवी दिल्ली येथे रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. त्यांनी या उद्योग संघटनेच्या सदस्यांना सांगितले की, गहू उत्पादनांना मागणी सातत्याने वाढत आहे. यामुळे गहू पिकाखालील क्षेत्र वाढवण्यासाठी काम करण्याची गरज आहे..Nutritional Value Of Wheat : आपण रोज खात असलेल्या गव्हात किती असतात पोषक तत्वे?.आटा (गव्हाचे पीठ) निर्यातीला परवानगी आहे. पण ती अॅडव्हान्स इम्पोर्ट ऑथरायजेशन योजनेअंतर्गत आहे, याकडे लक्ष वेधत रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नवनीत चितलांगिया म्हणाले की, गहू उत्पादनांच्या निर्यातीला आता टप्प्याटप्प्याने परवानगी देण्याची वेळ आली आहे.."आमच्याकडे सध्या गव्हाचा अतिरिक्त साठा उपलब्ध आहे. आटा, मैदा आणि सुजी (रवा) यासारख्या गहू उत्पादनांच्या निर्यातीसाठी टप्प्याटप्प्याने मोकळीक द्यावी, अशी आमची विनंती आहे. देशांतर्गत मागणीची पूर्तता करत असताना जागतिक बाजारपेठेचा फायदा उठवण्यासाठी किमान १० लाख टनांपासून निर्यातीस सुरुवात करायला हवी," असे चितलांगिया म्हणाले..Wheat Cultivation : खपली गहू लागवड यंदाही कमीच राहणार.गहू उत्पादनांच्या निर्यातीला मोकळीक दिल्याने या उद्योगाला पुन्हा जागतिक बाजारपेठेत प्रवेश करता येईल. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालास चांगला भाव मिळेल. भारताला जागतिक स्तरावर एक विश्वासार्ह असा पुरवठादार म्हणून स्थान मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. .सध्या जागतिक बाजारातील दर आणि भारतीय गव्हाचा दर एकसमान नाही. भारतीय गहू प्रति टन ८०-९० डॉलर्सने स्वस्त आहे. भारतीय गव्हाला बाजारपेठ मिळवण्यासाठी संधी आहे. त्यासाठी सरकारने परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी गहू उत्पादनांच्या निर्यातीला परवानगी द्यायला हवी, असे एका पीठ गिरणी व्यावसायिकाने सांगितले. .२०२२ मध्ये भारताने गहू आणि गहू उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यानंतर मध्य पूर्वेत काही गिरण्या सुरू झाल्या आहेत. त्या जगभरात राहणाऱ्या भारतीय समुदायासाठीच आटा तयार करत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले..दुसरीकडे, जोशी यांनी म्हटले आहे की, निर्यातबंदीबाबतच्या निर्णयात अनेक मंत्रालयांचा सहभाग आहे. सरकारला पुढील वर्षीच्या गहू उत्पादनाचाही विचार करेल. ज्याची पीक काढणी एप्रिल २०२६ पासून सुरु होईल..ग्राहकांच्या हिताच्या आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टीने मागणी किती आहे? हे विचारात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. "तुम्ही निर्यातीबाबत विचारणा करत आहात. आम्ही त्यावर विचार करु. आमचे सर्वोच्च प्राधान्य अन्न सुरक्षेला आहे. यामुळे याबाबत आम्ही खात्री देऊ शकत नाही," अशे जोशी यांनी स्पष्ट केले. आटा निर्यातीला परवानगी देण्याचा तूर्त विचार नसल्याचेही ते म्हणाले..बफर स्टॉक वाढवण्याची का गरज आहे?भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. केंद्र सरकारने २०२२ मध्ये कमी उत्पादन, सरकारी खरेदीत झालेली घट आणि वाढत्या महागाईच्या चिंतेमुळे गहू आणि त्यानंतर गहू उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घातली. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, २०२४-२५ मध्ये ११७.५१ दशलक्ष टन एवढे विक्रमी गहू उत्पादन मिळाले..बाजारातील भाव स्थिर ठेवण्यासाठी सरकारी राखीव साठा महत्त्वाचा आहे. यामुळे वेळेत लक्ष घालण्यासाठी आणि दर स्थिरतेची खात्री मिळण्यासाठी केंद्राने पुरेसा साठा ठेवावा, अशी विनंती फेडरेशनने केली आहे..पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना २ लाख क्विंटल गहू बियाणे मोफतपंजाबमधील शेतकऱ्यांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने पुरामुळे ५ लाख एकर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २ लाख क्विंटल गहू बियाणे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आता ७४ कोटी रुपयांचे २ लाख क्विंटल बियाणे मोफत पुरवले जाईल, असे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.