Food Inspection Ahilyanagar News: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील व्ही. एस. एकदंत फूड प्रॉडक्ट्स या आस्थापनेवर कारवाई केली. या कारवाईत कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून ‘काऊ घी’ या अन्नपदार्थाचा एकूण २ लाख ६० हजार ८२० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे..संगमनेर येथील व्ही. एस. एकदंत फूड प्रॉडक्ट्स येथे अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत अनुपालन होत नसल्याचे, तसेच अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत संशय आढळून आल्याने ‘काऊ घी (जार)’ व ‘काऊ घी (१५ किलो टिन)’ या अन्नपदार्थांचे नमुने घेऊन संबंधित साठा जप्त करण्यात आला..Vegetable Processing: फ्रेश-कट उद्योगासाठी कच्च्या मालाचे प्रक्रिया तंत्र.जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये ‘काऊ घी (जार)’ १७६ लिटर असून त्याची किंमत १ लाख ३५ हजार ५२० रुपये आहे. तसेच ‘काऊ घी (१५ किलो टिन)’ १७९ किलो असून त्याची किंमत १ लाख २५ हजार ३०० रुपये आहे. असा एकूण २ लाख ६० हजार ८२० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे..Milk Adulteration Control System: दूध भेसळीला आतापर्यंत आळा का बसला नाही?च पूर्वीच्या यंत्रणेवर शेतकऱ्यांचे प्रश्नचिन्ह.जप्त साठ्यातून घेण्यात आलेले नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे..दरम्यान, आष्टी (जि. बीड) येथील दूध भेसळ प्रकरणात सहभाग आढळून आल्याने खर्डा (ता. जामखेड) येथील भगवान कृपा दूध संकलन व शीतकरण केंद्र या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.