Turmeric Management: शेतकरी नियोजन । पीक : हळदशेतकरी : हणमंत दिगंबर शिंदेगाव : जोमेगाव ता. लोहा, जि. नांदेड.एकूण क्षेत्र : १६ एकरहळद क्षेत्र : दोन एकर.नांदेड जिल्ह्यातील जोमेगाव (ता. लोहा) येथील हणमंत शिंदे यांच्याकडे १६ एकर जमीन आहे. त्यापैकी दोन एकर क्षेत्रामध्ये हळदीची लागवड केली. उर्वरित ५ एकरात कापूस, साडेसहा एकरात सोयाबीन आणि अडीच एकरांत तुती लागवड आहे. यंदा ३ जूनच्या दरम्यान हळद लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे..लागवड नियोजनलागवडीपूर्वी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेताचे नांगरणी करून बैलजोडीच्या मदतीने वखरणी केली. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत शेतात मिसळून रोटर फिरविला.लागवडीसाठी चार फूट अंतरावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेड तयार केले.तयार बेडवर दोन ओळींत बारा इंच सात इंच अंतरावर हळद लागवड करण्यात आली. लागवडीसाठी सेलम या हळद जातीची निवड करण्यात आली आहे.लागवडीसाठी निरोगी, कीड-रोगमुक्त बेणे निवड करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानुसार निवडलेल्या बेण्यास लागवडीपूर्वी जैविक व रासायनिक घटकांची बेणेप्रक्रिया करण्यात आली..Turmeric Farming: हळदीमध्ये पीक संरक्षण, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.अन्नद्रव्ये व्यवस्थापनउगवणीनंतर १५ दिवसांनी पोटॅश, निंबोळी पेंड, १०:२६:२६, डीएपी, युरिया या खतांच्या मात्रा देण्यात आल्या.लागवडीनंतर ३० दिवसांनी हुमणीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करण्यात आला.लागवडीच्या ४० दिवसांनंतर ठिबकद्वारे १९:१९:१९ हे विद्राव्य खत दोन टप्प्यात दिले. त्यानंतर लगेच ह्युमिक ॲसिडचा ठिबकद्वारे वापर केला.लागवडीनंतर ७० दिवसांनी १२:६१:० या खताची प्रति एकरी मात्रा दिली..पीक संरक्षणकरपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी घेण्यात आली आहे. यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील देण्यात आली.पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर रासायनिक कीटकनाशकांच्या वापरात सातत्य राखण्यात आली. त्यासाठी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार दोन वेळा रासायनिक कीटकनाशकांचा आळवणीद्वारे वापर करण्यात आला..Turmeric Crop Disease: हळदीवरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना.आगामी नियोजनसध्या पीक कायिक वाढीच्या अवस्थेत असून आगामी काळात कंद पोसण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल.यापुढील काळात १२:६१:० व पोटॅश या विद्राव्य खतांचा ठिबकद्वारे वापर करण्यात येईल.वातावरणातील बदल जसे की ढगाळ हवामान, पाऊस अशी स्थिती राहिल्यास, ठिबकद्वारे नियमितपणे खतांच्या मात्रा तसेच बुरशीनाशके आणि कीडनाशके देण्यात येतील.पावसात खंड पडल्यास वाफसा स्थिती पाहून सिंचनाचे नियोजन केले जाईल..कंदकूजसाठी केलेल्या उपाययोजनामागील १५ दिवसांत जास्त प्रमाणात पाऊस झाला होता. हळद लागवडीसाठी काढलेल्या सरीमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे कंदकूज दिसून येण्यास सुरुवात झाली होती. प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आणि नियंत्रण मिळविण्यासाठी त्वरित साचलेले पाणी शेताबाहेर काढण्यात आले. हळद पिकामध्ये उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा जमिनीत वाढणारे कंद आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी शेताबाहेर काढून निचरा करण्यात आला. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शिफारशीत रासायनिक बुरशीनाशकांचा आळवणीद्वारे वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवणे शक्य झाल्याचे हणमंत शिंदे सांगतात.- हणमंत शिंदे ८८८८८९ ८८४७९(शब्दांकन : कृष्णा जोमेगांवकर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.