Kolhapur News: राज्यात तोडणीस जाणाऱ्या बहुतांशी उसाला तुरे आल्याने याचा विपरीत परिणाम शेवटच्या टप्प्यातील ऊस तोडणीवरही होणार आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ उसाला तुरे राहिल्यास ऊस पोकळ होऊन एकरी पाच ते पंधरा टनांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता असल्याने ऊस उत्पादकांत चिंता निर्माण झाली आहे..मुख्यत्वे करून, आडसाली तोडणी उशिरा होत असल्याने तुऱ्याचा सर्वाधिक फटका तोडणीस आलेल्या उसाला बसण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी उसाला अवेळी तुरे येत असल्याने ऊस रोपवाटिकांसाठी देण्याची धडपड सुरू ठेवली आहे. राज्यातील ऊस हंगाम मध्यावर आला आहे. पुढील हंगामात कारखान्यांना तुरे आलेल्या उसाचे गाळप करावे लागणार असल्याने उताऱ्यातही घट होण्याची शक्यता साखर कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केली..Sugarcane Flowering: तुऱ्यामुळे ऊस उत्पादन घटते का? वेळीच करा उपाययोजना.का आले उसाला तुरे?तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाच्या शेतात पाणी बरेच दिवस साठून राहिले होते. सततच्या पावसामुळे पिकास नत्राचे हप्ते वेळेवर देता आले नाहीत. जास्त पावसामुळे जमिनीतील बरेचसे नत्र पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये उसामध्ये फुलकळी तयार होण्यास अनुकूल हवामान होते. त्यामुळे या वर्षी बहुतेक ऊस जातींना तुरा लवकर आणि जास्त प्रमाणात आला आहे. राज्यात ऊस पट्ट्यात सगळीकडेच तुरा येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले..वातावरणाचा परिणामतुरा आलेला ऊस जर शेतामध्ये दीड ते दोन महिन्यांच्या पुढे राहिला तर पांगशा (फुटवे) फुटतात, ऊस पोकळ पडण्यास सुरुवात होते. त्यातील साखरेचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्टोज या विघटित साखरेमध्ये रूपांतर होते. त्यामुळे साखर उतारा कमी होतो. साधारणपणे या कालावधीत.Sugarcane Harvesting: हार्वेस्टर तोडणीसाठी एकरी ७ हजारांचा फटका .दिवसाचे तापमान २६ ते २८ अंशसेल्सिअस, रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस व हवेतील आर्द्रता ६५ ते ९० टक्के इतकी होती..तोडणी यंत्रणेकडून मुस्कटदाबीतुरे सुटल्याने नुकसान टाळण्याकरिता शेतकरी ऊस तोडणीसाठी गडबड करत आहेत. पण तुरा सुटलेल्या उसाला वाढे चांगले नसल्याने तोडणी कामगार असा ऊस तोडण्यास नाखूष आहेत. यामुळे वाडे नसल्याने नुकसान होत असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्याकडून जादा रक्कम मिळविण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र शिवारात आहे. यामुळे तुरा येण्यास पोषक वातावरण तयार झाले. थंडीच्या कालावधीत अशा प्रकारचे नुकसान कमी प्रमाणात होते. तथापि, वातावरणातील तापमान जसजसे वाढत जाईल, तसतसे उसाचे वजन व साखर उतारा घटून नुकसान होते..नव्या लागवडीलाही तुरेतुटणाऱ्या उसाबरोबरच अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यापासून नवी ऊस लागवड करण्यास प्राधान्य दिले. जून-जुलैलाही चांगला पाऊस झाल्याने ऊस लागवडी वाढल्या. सध्या हा ऊस पाच ते सहा महिन्यांचा आहे. पण या उसाला वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे तुरे येण्यास सुरवात झाल्याने पुढील हंगाम सुरू होईपर्यंत हा ऊस कसा टिकवायचा, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. यामुळे तोडणीला आलेल्या उसाबरोबर आडसाली लावणीलाही तुरे येत असल्याचे चित्र राज्यातील उस पट्ट्यात आहे..यंदा पाऊस लांबल्याने उसासाठी अतिशय विपरीत हवामान राहिले. अतिपावसाने वाढ झाली नाहीच. पण पावसानंतरही लवकर तुरे आल्याने उसाच्या अधिक नुकसानीची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जास्त तुरा आलेला ऊस कालावधी वाढण्याआधी कारखान्याला जाणे गरजेचे आहे.डॅा. अशोक पिसाळ, माजी सहयोगी अधिष्ठाता, राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय,कोल्हापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.