Jalgaon News: गणेशोत्सव, गौरी या सणानिमित्त फुलांना मोठा उठाव आहे. श्रावणमासात फुलांच्या दरात सुधारणा झाली. विविध फुलांचे दर टिकून असून, गुलाबास ४०० रुपये प्रतिशेकडा आणि निशिगंधच्या फुलांना एक हजार रुपये प्रतिकिलोचा दर आहे. .फुलांच्या उत्पादनास पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात जळगाव तालुक्यातील शिरसोली, आसोदा, तरसोद, नशिराबाद, बेळी आदी गावे फुलांच्या उत्पादनात अग्रेसर आहेत. यात शिरसोलीत सर्व प्रकारच्या फुलांचे बारमाही उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक झेंडू व गुलाब फुलांचे उत्पादन आहे. जरबेरा व अन्य फुले पुणे, नाशिक भागातून जळगावच्या बाजारात येत आहेत. .Flower Market: गणेशोत्सव, गौरी पूजनामुळे फुलांची मागणी वाढली.वल्लभदास वालजी (व.वा.) व्यापारी संकुलातील फूलबाजारात पहाटेच फुलांची आवक होत आहे. अनेक मोठे खरेदीदार थेट शेतकऱ्यांकडून फुलांची खरेदी करून घेत आहेत. श्रावणमासात झेंडू, मोगरा फुलांना अधिकची मागणी होती. तसेच अन्य फुलांनाही उठाव होता. यामुळे दर टिकून राहिले. .पण गणेशोत्सवात दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. मागील हंगामात झेंडू, गुलाबाच्या फुलांचे दर कमी होते. झेंडूस प्रतिकिलो ५० ते ६० रुपये प्रतिकिलोचा दर लिलावात श्रावणमास व गणेशोत्सवात मिळाला होता. यंदा मात्र झेंडूचे दर १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असे असल्याची माहिती मिळाली. उत्पादन कमी, पण दर टिकून असल्याने तेवढा आधार फूल उत्पादकांना होत आहे. .Flower Market : गुरुपौर्णिमेनिमित्त गुलाबाला भाव.फुलांची आवक चाळीसगाव, जामनेर, छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव आदी भागांतूनही होत असल्याचे सांगण्यात आले. जळगावच्या बाजारातून फुलांची पाठवणूक अमरावती, अकोला, नाशिक, नंदुरबार, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, गुजरातमधील बडोदा, अहमदाबाद येथे केली जात आहे..झेंडूची सध्या प्रतिदिन ३० ते ३२ क्विंटल आवक होत आहे. निशिगंध फुलांची दीड ते दोन क्विंटल, मोगरा फुलांची एक ते दीड क्विंटल आवक होत आहे. गुलाब फुलांचे २० ते २२ हजार नग बाजारात लिलावासंबंधी येत आहेत. .Flower Market: गुढीपाडव्याला फुलबाजार बहरला.पावसाने हानीपावसामुळे झेंडू, मोगरा, निशिगंध आदी फुलांच्या शेतीची हानी झाली आहे. गुलाब फूल पिकाची हानी कमी आहे. पण रोगराईदेखील आहे. बाजारात टवटवीत, ताजा, दर्जेदार फुलांना उठाव असतो. यासाठी फूल उत्पादकांना दर्जेदार उत्पादनासाठी फवारणी, काटेकोर नियोजन पावसात करावे लागत आहे. .विविध फुलांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)झेंडू ११० ते १२०गुलाब ३०० ते ४०० रुपये प्रतिशेकडा.मोगरा ४०० ते ४५० निशिगंध ९०० ते १००० शेवंती १८० ते २००.फुलांच्या उत्पादनास पावसाचा फटका बसला आहे. झेंडू, मोगरा, गुलाब आदी फुलांना मागणी आहे. दुसरीकडे आवक अधिक आहे. पण उत्पादन कमी असल्याने या दरांचा फारसा लाभ शेतकऱ्यांना होत नसल्याचे दिसते. पण दरांत सणासुदीमुळे सुधारणा झाली आहे. - श्रीराम बारी, फूल उत्पादक, शिरसोली, जि. जळगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.