Akola News: अकोला येथे आयोजित तिसऱ्या प्लांट मॉडेलिंग पुष्प प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण दंततज्ज्ञ डॉ. समृद्धी तिडके यांच्या हस्ते झाले. जनमंच, आंतरभारती, प्रगती शेतकरी मंडळ, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप जुनी वस्ती व यंग बॉइज क्लब कोकणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे दोनदिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले होते..या प्रदर्शनात परिसरातील पुष्प व वृक्षप्रेमींनी कुंड्यांतील रोपे, विविध फुले, बोन्साय, वेलींमधून साकारलेली आकर्षक मॉडेल्स यांची नेत्रदीपक मांडणी केली. यंदा सर्वाधिक पुरस्कार पटकाविण्याचा मान मूर्तिजापूरच्या सविता कुचर यांनी मिळविला..Flower Exhibition: एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन शुक्रवारपासून.शीतल संजय साबळे यांनी वेलींमधून साकारलेला मोर, तर सरिता कुचर यांनी सजविलेला पुतळा विशेष आकर्षण ठरला. गुलाब, बोन्साय, हँगिंग, इनडोअर व आउटडोअर विभागांत अनेक स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली..Flower Exhibition: अद्ययावत तंत्रज्ञानरूपी फूलशेती .प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी अकोला गार्डन क्लबचे जयप्रकाश मुरूमकार अध्यक्षस्थानी होते. मुख्याधिकारी नीलेश जाधव यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. सायंकाळी कवी संमेलन व दुसऱ्या दिवशी ‘संगीत रजनी’ कार्यक्रमाने प्रदर्शनात सांस्कृतिक रंगत भरली..नागपूर, अमरावती, वरूड, जळगाव आदी ठिकाणच्या संस्थांनी लावलेल्या स्टॉल्सना प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमासाठी राजू वानखडे, प्रा. सुधाकर गौरखेडे, सेवकराम लहाने, माधवराव काळे, पंकज कांबे, गजानन ठोकळ, कैलास साबळे, ज्ञानदेवराव भड, मुन्ना नाईकनवरे, नंदकिशोर बबानिया, चंदन अग्रवाल, गोपाल तायडे, सचिन पवार, नजीर शाह, संजय वैद्य, समाधान इंगळे, अनिल राठोड, आशिष अग्रवाल, अरुण बोंडे यांनी पुढाकार घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.