Latur News: सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे बेन्नीतुरासह उपनद्यांना आलेल्या महापुराने परिसरातील शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी अनेकांच्या शेतात शिरून शेती पिकांसह खरवडून गेले असून, विहिरी गाळाने भरल्या आहेत. .शिवारात बांध-बंधारे मोठ्या प्रमाणात फुटल्याने शेतरस्त्याची वाताहत झाली. या नुकसानीकडे पाहता शेती पेरणी योग्य करणे हे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असून, शासनाची आर्थिक मदतही तुटपुंजी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. .Maharashtra Flood Damage: पुरामुळे लाखांहून अधिक पशुधनाचा बळी.जेवळी (ता. लोहारा) परिसरातील गावांत गेल्या पंधरवड्यात झालेल्या सुरू असलेला सलग पाऊस; तसेच २० ते २२ सप्टेंबर या सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे बेन्नीतुरासह उपनद्यांना महापूर आला होता. अनेक वर्षांनंतर असा महापूर आल्याचे सांगण्यात आले. या पुराचे पाणी अनेकांच्या शेतात शिरून शेतीचे खूप मोठे नुकसान झाले..ठिकठिकाणी शेती पिकांसह खरडून गेली असून, फडात खडक, दगड पडले आहेत. काही ठिकाणी वाहून आलेल्या गाळाने पिके हे बुजून गेली आहेत. शिवारात बांध-बंधारे फुटून मोठे चर, घळी पडल्या आहेत. याबरोबर नदीकाठच्या विहिरीत पाणी गेल्याने विहिरी गाळाने भरल्या आहेत. .Flood Damage : लालफितीत अडकले चिंचोलीचे पुनर्वसन.जागलीवरील शेती साहित्य, अवजारे, कडब्याच्या गंजी, शेत रस्ते वाहून गेले आहेत. पूर ओसरल्यानंतर आता या प्रचंड नुकसानीचा अंदाज येत आहे. एकूणच अनेक शेतकऱ्यांना शेती पेरणी योग्य करण्यासाठी अनेक दिवसांचे परिश्रम व लाखो रुपये खर्च येणार आहेत. या नुकसानीकडे पाहता शासनाची आर्थिक मदत ही तुटपुंजी ठरणार असल्याची चर्चा होत आहे. .अतिवृष्टीमुळे शिवारातील शेतरस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी भराव वाहून खड्डे पडले आहेत. काही रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने शेत रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत.- भीमाशंकर साखरे, शेतकरी.पुरामुळे ओढ्यालगत असलेल्या गोठ्यात पाणी शिरले होते. यावेळी सुदैवाने पशुधन वाचले; परंतु दोन हजारांची कडब्याची गंजी वाहून गेली आहे. त्यामुळे आता पशुधनावर उपासमारीची वेळ आली आहे.- वैजीनाथ ढोबळे, शेतकरी.नदीचे माझ्या शेतात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात बंधारे फुटले असून जमीन पिकासह खरडून गेली आहे. शेतीत दगड-गोटे, गाळ पसरून शेती नापीक झाली आहे.- सुभाष चटगे, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.