Solapur News : माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावात आलेला पूर हळूहळू ओसरत असला तरी घरातील चिखलाचा राडारोडा, भुईसपाट झालेली पिके, उघड्या पडलेल्या पाईपलाईन, वाहून गेलेली माती, खचलेले बांध, चिखलाने भरलेले गाईगुरांचे गोठे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकल्या असून अगोदरच खरीप हंगाम वाया गेला असून रब्बी हंगामाच्या तोंडावर पुराने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे..पूरस्थिती आणखी पूर्णपणे ओसरली नसून शेतात अनेक ठिकाणी पाणी साठलेले आहे. उद्ध्वस्त झालेली शेती आणि मोडून पडलेला संसार पुन्हा उभारण्यासाठी शेतकरी कंबर कसू लागला असून शासनाने त्याच्या पाठीशी राहण्याची आवश्यकता आहे..माढा तालुक्यामध्ये सीना नदीकाठी परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडल्याने मोठी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पुराचे पाणी हळूहळू ओसरून माढा - वैराग व इतर रस्त्यांची वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. शेतातील ऊस, उडीद, मका यासारखी पिके हातची गेली आहेत..ओसरणाऱ्या पुराबरोबरच शेतकऱ्यांनी यंदा चांगली दिवाळी करण्याची पाहिलेली स्वप्नही ओसरू लागली आहेत. एक नाही अनेक संकटांना शेतकऱ्यांना घेरले असून विद्युत मोटारी पाण्याखाली गेलेल्या आहेत. विद्युत जनित्राभोवती पाणी आहे. यातून बाहेर कसे पाडायचे हा शेतकऱ्यांकडे प्रश्न आहे..Hingoli Crop Damage: ऑगस्टमध्ये दोन लाख हेक्टरवर नुकसान.दारफळ भागातील व काही गावातील वाड्यावर त्यामध्ये आणखीही पुराचे पाणी आहे. रस्ते, बांध खचल्याने, शेताकडे जाणारी रस्तेही पाण्याखाली असल्याने व शेतात पाणी असलेले अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतापर्यंत अद्यापही जाता आलेले नाही. .Soybean Crop Damage: तीस टक्के सोयाबीनला पावसाचा जबर फटका.त्यामुळे नुकसानीचा नेमका अंदाज शेतकऱ्यांना लागत नाही. ही परिस्थिती माढा तालुक्यातील सीना नदीकाठी असणाऱ्या रिधोरे, तांदुळवाडी, निमगाव (माढा), राहुलनगर, दारफळ उंदरगाव, केवड, वाकाव, खैराव, कुंभेज यासह अनेक गावांमध्ये गावांमध्ये दिसून येत आहे..सावंत कुटुंबीय दोन दिवसांपासून घरातचप्रा. शिवाजीराव सावंत यांच्या जयवंत बंगल्यालाही चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून सावंत कुटुंबीय दोन दिवसांपासून अडकून पडले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.