सुनील चावके जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ही उत्तर भारतातील सीमावर्ती राज्ये केवळ राजकीयदृष्ट्याच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही अतिशय संवेदनशील असल्याची प्रचिती यंदाच्या मॉन्सूनमध्ये आली. या राज्यांसाठी २०२५ शापित वर्ष ठरले. विशेषतः यंदाचा पावसाळ्यात शेकडोंच्या संख्येने झालेल्या ढगफुटी, जलप्रलय, भूस्खलन, पुरांच्या घटनांच्या न संपणाऱ्या मालिकेमुळे हजारोंच्या संख्येने झालेली जीवितहानी आणि हजारो कोटींची वित्तहानी झाल्याने जनजीवन आणि अर्थकारण मोडीत निघालेल्या या राज्यांना अनपेक्षित नैसर्गिक संकटांतून सावरण्यासाठी किमान एक वर्ष लागेल. .मॉन्सूनची सप्टेंबरअखेर माघार सुरु होत असताना पंजाब, हरियाना, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थानातील पूरग्रस्त भागांना यंदाचा सणासुदीच्या मोसम निसर्गाने केलेल्या असंख्य आणि अपरिमित जखमांची मोजदाद करण्यातच जाणार आहे. यंदा देशभरात ८७ सेंटिमीटरच्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा पाच टक्के जास्त पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने एप्रिल महिन्यात वर्तविला होता..Northeast India Floods: ईशान्य राज्यांमध्ये पूर, भूस्खलनामुळे स्थिती बिकटच.सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान अपेक्षित असलेल्या पूर्व, ईशान्य आणि वायव्य भारत आणि दक्षिणेकडील द्वीपकल्पांव्यतिरिक्त देशातील उर्वरित राज्यांमध्ये सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी होईल, असे हवामान खात्याने म्हटले होते. हे भाकित उत्तर भारतातील राज्यांच्या बाबतीत अपेक्षेपेक्षाही जास्तच खरे ठरले. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा २२ टक्के पावसाची नोंद झाली. तो अजून संपलेला नाही..या राज्यात पावसाळ्यादरम्यान ६५ टक्के दिवस अतिशय प्रतिकूल आणि लहरी हवामानाचे होते. हिमाचल प्रदेशात मॉन्सून काढता पाय घेत आहे. पण तीन महिन्यांच्या आपल्या मुक्कामादरम्यान ४३ टक्के पर्जन्यवृष्टीची नोंद केली. पंजाबमध्ये तर ५१ टक्के जास्तीच्या पावसाने पूर्ण ग्रामीण भागात कहर माजवला. या सर्वच राज्यांमध्ये आणि अगदी राजधानी दिल्लीतही झालेल्या ढगफुटीने बेसावध नागरिकांची कोंडी केली..North India मध्ये Cotton Sowing 15 percent ने वाढण्याची शक्यता|Cotton Sowing|ॲग्रोवन.पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर यंदा उत्तर भारतातील पर्यटनाला एकप्रकारे दृष्टच लागली. दहशतवादाच्या सावटाखाली आलेल्या जम्मू आणि काश्मीरला निसर्गानेही सोडले नाही. जम्मू शहर, वैष्णोदेवी (कटरा) आणि अर्धकुमारी (रेईसी), कथुआ, उधमपूर, सांबा, डोडा, किश्तवार (चाशोटी), या भागांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे शेकडो भाविक, नागरिक आणि यात्रेकरूंना जीव गमवावे लागले..रस्ते आणि महामार्ग वाहून गेले. जम्मू-श्रीनगर, जम्मू-पठाणकोट हे महामार्ग बाधित झाले. अनेक पूल मोडीत निघाले. वाहतूक कोलमडली. घरे, दुकाने, हॉटेलांची वाताहत झाली. वीज, पाणीपुरवठा, इंटरनेट सेवा अनेक दिवसांसाठी खंडित झाल्या. सतलज, ब्यास, रावी नद्यांना अनेक दशकांमध्ये आलेल्या महापुराचा २२ जिल्ह्यांना फटका बसून पंजाबच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले..North East Monsoon Withdrawn: ईशान्य मान्सूनचा देशातून काढता पाय; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता .पंजाबच्या हानीचा अंदाज घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हवाई पाहणी करावी लागली, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंजाबसाठी वीस हजार कोटींच्या मदतीची मागणी केली. हिमाचल प्रदेशात यंदा मॉन्सूनमध्ये ९८ वेळा अचानक, कुणाच्या ध्यानीमनी नसताना वेगाने पूर येण्याच्या घटना नोंदविल्या गेल्या. पन्नासवेळा ढगफुटी झाली. भूस्खलनाच्या दीडशे घटना घडल्या..त्यामुळे तीन हजारांहून अधिक घरे पूर्णपणे ध्वस्त झाली, तर पंधरा हजारांहून अधिक घरे, दुकाने आणि गोठ्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. डझनावारी रस्ते आणि पूल वाहून गेले. शहरी भागांमध्ये अनेक आठवडे पाणी आणि वीज पुरवठा खंडित झाला. सिमला, कुल्लू आणि मंडी भागात मोठी हानी झाली. शेकडो लोक मृत्यमुखी पडले, तर हजारो लोक वाहून गेले वा बेपत्ता झाले. शेती आणि पायाभूत सुविधांची प्रचंड हानी झाली..South Vs North : दक्षिण विरुद्ध उत्तर संघर्ष.आधीच दृष्ट लागलेल्या हिमाचलमधील सफरचंदाच्या वाहतुकीला निसर्गाचाही फटका बसला. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात पाच ऑगस्ट रोजी डोंगरांच्या कुशीत वसलेले टुमदार धराली गावाचे अवघ्या ४०-४५ सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते झाले. उंच डोंगरावर झालेल्या ढगफुटीमुळे चिखल आणि पुराचा धबधबा कोसळून काही कळण्याच्या आतच धराली गावाचा मोठा भाग नेस्तनाबूत झाला..त्यावेळी या भागात देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश होता. पर्यटक थांबलेले अनेक हॉटेल वाहून गेले. धरालीची दृश्ये थरकाप उडविणारी होती. देहरादूनच्या सहस्रधारा-मालदेवता-तमसा नदी परिसरात तीव्र पावसामुळे ढगफुटी होऊन अचानक आलेल्या पुरामुळे पूल वाहून गेले, घरे-हॉटेल्स जलमय झाली, अनेक धार्मिक स्थळे व आयटी पार्क परिसर पाण्याखाली गेला..Weather Update : North Maharashtra, Marathwada,Cold will continue in Vidarbha| Agrowon.पुराचा तडाखाहरियानामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ व बंधाऱ्यांच्या गळती होऊन अनेक गावांना पुराचा तडाखा बसला. शेतीला फटका बसल्याची तक्रार लाखो शेतकऱ्यांनी नोंदविली. राजधानी दिल्लीत यमुना नदीची वाढती पातळी व अतिवृष्टीमुळे सखोल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून काही मृत्यूंची नोंद झाली आणि अनेक वसाहतींतील नागरिकांना स्थलांतर करावे लागले..यंदाच्या पावसाळ्याने उत्तर भारताचा ठिसूळपणा उघड केला. भुसभुशीत डोंगर पोखरुन साधलेला वेगवान विकास दिखाऊ असला तरी त्यात टिकाऊपणा नसतो, हे उत्तर भारताच्या पाकिस्तान आणि चीन सीमेलगतच्या राज्यांमध्ये निसर्गाने तीन महिन्यांच्या तांडवातून दाखवून दिले. ढगफुटी व अतिशय तीव्र पाऊस यामुळे डोंगराळ प्रदेशांत अचानक पूर व भूस्खलनाला निमंत्रण मिळते..Weather Update : North Maharashtra, Marathwada,Cold will continue in Vidarbha| Agrowon.मैदानी भागांमध्ये शिरलेल्या पुरामुळे हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होते. जुनी किंवा गळती लागलेली धरणे आणि शहरी निचरा करण्यात अपुरी ठरलेल्या गटारांमुळे नागरिकांनी कमाई वाया तर जातेच, शिवाय उपजीविकेचेही वांधे होतात. संंततधार पावसामुळे आधीच ओलसर झालेली जमीन व नद्यांचे उंचावलेले पाणी यामुळे पुन्हा आलेल्या पावसाचे तडाखे अधिक धोकादायक ठरते..मॉन्सून संपल्यानंतर उत्तर भारतातील निसर्ग बहरून उठतो. पण उत्तर भारतातील पूरग्रस्त राज्ये पर्यटनाच्या लायकीची राहणार नाही, याची निश्चिती यंदाच्या मॉन्सूनने केली आहे. या सर्वच राज्यांची किमान पन्नास हजार कोटींची हानी झाली आहे. पर्यटनाला आवश्यक ठरणाऱ्या पायाभूत सुविधांची पूर्णपणे वाट लागल्यामुळे माघारी फिरत असलेल्या मॉन्सूननंतर काय हा प्रश्न या राज्यांना भेडसावणार आहे..खरीपात शेतीची हानी झाली तर ती रबीच्या मोसमात किंवा पुढच्या खरीप हंगामात भरुन निघेलही. पण या आशावादावर विसंबून न राहता मोदी सरकारला भेदभाव न करता भाजप वा विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये झालेल्या हानीची संवेदनशीलपणाने दखल घेऊन उदारपणाने मदतीचा हात पुढे करावा लागणार आहे. त्याचवेळी सिंधू नद्यांच्या पाण्याच्या नियोजनाचाही विचार करावा लागणार आहे.(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.