Ahilyanagar News : जिल्ह्याच्या पूर्व भागात आठवडाभर मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सोळा दिवसात तब्बल ५ लाख ७४ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. १२९८ गावांतील ८ लाख ३४ हजार ५७८ शेतकऱ्यांना या आपत्तीचा फटका बसल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाकडून वेगाने पंचनामे केले जात असून आतापर्यंत ७० टक्के म्हणजे ३ लाख ९० हजार हेक्टरचे पंचनामे उरकले आहेत..अहिल्यानगर जिल्ह्याच्या पश्चिम भागाला अतीवृष्टीचा अधिक फटका बसला आहे. सीना, खैरी, ढोरा, नंदिनी, मुळा, प्रवरेला अती पावसामुळे पुर आले. याशिवाय स्थानिक पातळीवरील नद्याला पुर सुरु आहे. पुराने अनेक गावे आपत्तीग्रस्त झाली असून शेतीचे प्रचंड नुकसान सुरु आहे. .जिल्हाभरातील सुमारे जवळपास शंभरापेक्षा अधिक महसुलमंडळात अतीवृष्टी झालेली आहे. प्रशासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. मात्र शेतात पाणी, चिखल असल्याने पंचनामे करताना प्रशासनातील अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. कृषी विभागाकडील प्राथमिक अहवालानुसार १२९८ गावांतील ८ लाख ३४ हजार ५७८ शेतकऱ्यांच्या शेतातील ५ लाख ७४ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. .Crop Damage Survey : पीकहानीचे पंचनामे रखडले.यातील ३३ हजार ३३८ शेतकऱ्यांचे २० हजार ०३४ हेक्टरवरचे नुकसान हे ३३ टक्क्यापेक्षा कमी आहे. झालेल्या एकूण नुकसानीचा अहिल्यानगरला ११७ गावांत ७६ हजार ७०५ शेतकऱ्यांचे, पारनेरला १३० गावांत ९५ हजार १०२ शेतकऱ्यांचे, पाथर्डीला १३७ गावांत १ लाख १ हजार ५८०, कर्जतला ११९ गावांत ४७ हजार ४८४ शेतकरी, जामखेडला ८७ गावांत ४९ हजार ९३६ शेतकऱ्यांचे, श्रीगोंद्याला १०५ गावांत ६८ हजार ४३५ शेतकऱ्यांचे, श्रीरामपुरला ५५ गावांत ४९ हजार ४१५ शेतकऱ्यांचे, राहुरीला ९६ गावांत ५० हजार १२ शेतकऱ्यांचे, नेवाशाला १२७ गावांत ७८ हजार ९५० शेतकऱ्यांचे, शेवगावला ११३ गावांत ८९ हजार ६८७ शेतकऱ्यांचे, संगमनेरला ६४ गावांत १४ हजार ७१९ शेतकऱ्यांचे, अकोल्यात ७ गावांत २८९ शेतकऱ्यांचे, कोपरगावला ८० गावांत ४५ हजार ८७२ तर राहाता तालुक्यात ६१ गावांत ५९ हजार ७१७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. .नुकसानात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मुग, कापूस, मका, बाजरी, केळी, फळपिकांसह भाजीपाल्याचे नुकसान अधिक आहे. शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड, नेवासा, श्रीगोंदा, राहाता तालुक्यात मोठी हानी झाली आहे. सीना, खैरी, नंदिनी, ढोरा, खैरी नदीसह स्थानिक नद्यांना आलेल्या पुरांमुळे जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे..Crop Damage Survey : पिकांचे ६० टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण.शेकडो एकर जमीनी पिकांसह खरडून गेल्या आहेत. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस आणि नुकसान झाले आहे. संपूर्ण पंचनाम्यानंतर मोठे नुकसान झाल्याची बाबत समोर येईल असे दिसतेय. पुर, अतिवृष्टीने जामखेड, नेवासा तालुक्यात प्रत्येकी व्यक्तींचा मृत्यू, दुभत्या जनावरांचा व वासरांचा मृत्यू, कुक्कुटपक्षाचा मृत्यू झाला. घरे पडली. घरात पाणी शिरल्याने संसारपयोगी वस्तु भिजल्या. जनावरांचे गोठे पुराने नष्ट झाल्यानेही मोठी आर्थिक हानी झाली आहे..नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झालेले क्षेत्र(कंसात एकूण अंदाजे नुकसान) (हेक्टर)अहिल्यानगर ः ३६,४०९ (५६,०१५), पारनेर ः २२,३३७ (५९,७०९), पाथर्डी ः ६८,३४१ (७७१५५), कर्जत ः ३२,६४५ (३०,६०६), जामखेड ः २८,४०० (३४,३२३), श्रीगोंदा ः २४,७०० (३८,४९८), श्रीरामपूर ः २५,४६४, (३५,२९३) राहुरी ः २८,९५०, (४४,५३८), नेवासा ः ४९,२२२ (५३२५०), शेवगाव ः ४७,९६४ (६०६९५), संगमनेर ः २,९०० (११,३६८), अकोले ः ३० (४१), कोपरगाव ः ५,४४५ (३३,०४०), राहाता ः १५,३०८ (४०,०६६)..अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत कृषी विभागाकडून बांधावर जाऊन वेगाने पंचनामे करण्यात येत आहे. आतापर्यंत ७० टक्के पंचनामे उरकले असून चार-पाच दिवसात सर्व पंचनामे उरकतील असे दिसतेय.- सुधाकर बोराळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.