Kolhapur News : वारणा नदीला आलेल्या पुराचे पाणी ओसरल्यानंतर शेतातील भात, सोयाबीन, भुईमूग यांसारखी पिके पूर्णपणे कुजली आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे..गेल्या आठवड्यात चांदोली धरणातून सुमारे ३६ ते ४० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे वारणा नदीला मोठा पूर आला. पाणी पाचव्यांदा पात्राबाहेर पडून शेतात शिरले. जवळपास एक आठवडा हे पाणी शेतीत साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे..Crop Damage : सांगलीत अतिवृष्टी, पुराचा पाच हजार हेक्टरवरील पिकांना फटका.पुरामुळे निलेवाडी गावातील दोन्ही मार्ग पाण्याखाली गेले होते, तर जुने पारगाव, जुने चावरे आणि घुणकी गावांमध्येही पाणी शिरले होते. सुदैवाने, या भागातून कुटुंबांना स्थलांतर करावे लागले नाही, परंतु भात, भुईमूग, सोयाबीन आणि ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घुणकी येथील प्रगतिशील शेतकरी संपतराव कुरणे म्हणाले, की ‘‘यावर्षी मे पासूनच पाऊस सुरू झाल्याने अनेक शेतींची मशागत वेळेत झाली नाही. .जी पिके चांगली वाढली होती, ती आता दोन वेळा पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी.’’ या कुजलेल्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे केली आहे..Crop Damage : भीमेच्या पुराने मंगळवेढ्यात पिकांचे नुकसान.कागलमधील तलाव ओसंडले, ३ हजार हेक्टर शेतीला पाणीसेनापती कापशी, जि. कोल्हापूर : यंदा पावसाळ्याच्या मध्यावरच कागल तालुक्यातील २४ पाझर तलाव आणि सहा लघू प्रकल्प पूर्ण भरून ओसंडून वाहत आहेत. यामुळे ३ हजार ४६४ हेक्टर शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे.या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत तालुक्यात ६९९ मिमी पाऊस झाल्यामुळे हे सर्व प्रकल्प वेळेआधीच भरले. सोनाळी, करंजिवणे, हणबरवाडी, शेंडूर, बेनिक्रे आणि पिंपळगाव येथील लघू प्रकल्पांमध्ये पुरेसे पाणी जमा झाले आहे. चिकोत्रा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांचा लाभ मिळत नसलेल्या अनेक गावांसाठी हे पाझर तलाव आणि लघू प्रकल्प जीवनवाहिनी ठरतात. .या प्रकल्पांमधून पाण्याचा पाझर वाढल्याने परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी वाढते. सर्वांत शेवटी भरलेल्या बेनिक्रे लघू प्रकल्पाने शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवली. या प्रकल्पाचा पाण्याचा स्रोत कमी असल्याने तो भरण्यासाठी नेहमी वेळ लागतो. तो भरल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे १७८५ हेक्टर शेती लघू पाटबंधारे प्रकल्पांवर, १४५३ हेक्टर शेती पाझर तलावांवर आणि २२६ हेक्टर शेती एका साठवण तलावावर अवलंबून आहे. पाणीटंचाईच्या काळात आधार देणारे प्रकल्प भरल्यामुळे रब्बी हंगामासाठीही पाण्याची सोय झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.