Solapur News : उजनी धरणातून भीमा नदीसह वीरधरणाकडूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने पंढरपूर शहरासह आसपासच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पाण्यामुळे नदीपात्रातील सर्व मंदिरांना पाण्याने वेढा घातला आहे, तर नदीकाठच्या झोपडपट्ट्यांसह उपनगरात पाणी शिरले आहे. दुपारपर्यंत शंभरहून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. .पाण्याच्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पूरस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. मंदिर परिसर, विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील घाट, तसेच नदी काठावरील व्यास नारायण झोपडपट्टीसह नदीकाठी वसलेल्या वस्त्यांमध्ये प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..Ujani Dam: उजनीतून ९० हजार क्युसेक विसर्ग.प्रशासनाकडून नागरिकांना सूचना करण्यत आ़ली आहे. नदीकाठी किंवा नीचांकी भागात राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, अनावश्यकपणे नदीकाठावर गर्दी करू नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. तालुका प्रशासन, पोलिस विभाग, आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आपत्कालीन बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले असून, आतापर्यंत शंभरावर कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे..Ujani Dam Capacity : उजनी धरण १०० टक्के भरले.भीमेतील पाणी पातळीत वाढभीमेच्या पाणीपातळीमध्ये वरचेवर वाढ होत असून, काल उजनी धरणातून ९० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत होता. पण आज गुरुवारी (ता. २१) तो तब्बल १ लाख ४० हजार क्यूसेक पर्यंत वाढवण्यात आला. .दौंड कडूनही उजनी धरणाकडे जवळपास १ लाख ७७ हजाराचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने उजनी धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी भीमेतील पाण्याचा विसर्ग वाढवण्याशिवाय प्रशासना समोरही पर्याय राहिला नाही, हे पाणी पुढे पंढरपूरकडे येत आहे, तर दुसरीकडे वीर धरणातूनही ४७ हजार क्यूसेक इतके पाणी भीमा नदीत नदीत मिसळत असल्याने पंढरपुरात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.