Pune News: मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सोमवारी (ता. २९) उसंत दिली. मात्र मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पूरस्थिती आणि जायकवाडी धरणातून केलेल्या विसर्गामुळे तब्बल २४ हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर सीना कोळेगाव धरणातून विसर्ग सोडण्यात आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात तिसऱ्यांदा पूरस्थिती उद्भवली आहे. अहिल्यानगर, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती ओसरली आहे. तसेच पश्चिम विदर्भात पिके पाण्याखाली असल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे..नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, तसेच सोलापूर, नाशिक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. तर सोलापूर-विजयपूर हा महामार्ग सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. खरीप पिके अद्याप पाण्यात असल्यामुळे नुकसानीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अतिवृष्टी आणि अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग असल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांत पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून बचाव पथकांद्वारे सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. जालना जिल्ह्याला याची सर्वाधिक झळ बसली आहे. जालन्यात दहा हजारांपर्यंत नागरिकांचे स्थलांतर केले आहे..सद्यःस्थितीत गेल्या १५ दिवसांपासून प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. मराठवाडा छत्रपती संभाजीनगर विभागात अतिवृष्टीमुळे शेतीचे व इतर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सर्वच विभागांतील बहुतेक धरणे तुडुंब भरली असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे..Maharashtra Flood Crisis : आम्ही तुमच्या सोबत आहोत....नाशिकमधील सर्वच धरणे तुडुंबनाशिक जिल्ह्यातील मोठ्या ७ व मध्यम १९ अशा एकूण २६ धरण प्रकल्पांमधील पाणीसाठा ९८.६७ टक्क्यांवर गेला आहे. तर यापैकी १३ धरणे तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाली आहेत. मागील वर्षी २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील धरणसाठा ९१.४८ टक्के होता. यंदा सप्टेंबरअखेर तो ९८.६७ टक्क्यांवर आहे. यंदा पाणीसाठा ८ टक्के अधिक असून पाण्याचा येवा असल्याने धरण परिचालन सूचीनुसार मोठ्या प्रमाणावर विसर्ग देखील करण्यात येत आहे..सीना नदीला पुन्हा महापूरगेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे, पण सीना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे सोमवारी (ता. २९) पुन्हा तिसऱ्यांदा सीना नदीत सुमारे ९५ हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने गेल्या आठवड्यातील महापुराच्या जखमा अजूनही ताज्या असताना, सोलापूर जिल्ह्याला पुन्हा तिसऱ्यांदा महापुराचा सामना करण्याची वेळ आली आहे. या पूरस्थितीमुळे माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यांतील नदीकाठच्या गावात पाणी शिरू लागले आहे. तर सोलापूर-विजयपूर हा महामार्ग सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे..शनिवारी आणि रविवारी बीड, अहिल्यानगर व धाराशिव जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पाण्याचा विसर्ग सीना नदीत मोठ्या प्रमाणात अखंडपणे सुरुच आहे. त्यामुळे पुन्हा सीना नदी महापुराच्या स्थितीकडे चालली आहे. जिल्ह्यात पाऊस झाल्यास या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पण सुदैवाने सोलापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाने थोडी उघडीप दिली आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत ३६०.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या २०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सीना नदीच्या महापुराचा फटका यापूर्वीही करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात बसला होता..Marathwada Flood : पावसाचे थैमान; सर्वत्र नदी-नाले एकरूप.आता पुन्हा भोगावती नदी (बार्शी), चांदणी व खासापुरी प्रकल्पातून येणाऱ्या पाण्याने स्थिती आणखी बिकट होऊ लागली आहे. सोमवारी (ता.२९) सीना नदीत जवळपास ९५ हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याच्या या वाढत्या विसर्गामुळे सोलापूर-विजयपूर मार्गावरील वडकबाळ (दक्षिण सोलापूर) येथील पुलावर पाणी आल्याने सध्या हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पुराचा धोका पुन्हा उद्भवल्याने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे..भीमा नदीकाठीही पूरस्थितीसीना नदीतील पाण्याने एकीकडे धुमाकूळ माजवला असताना, आता जिल्ह्यातील भीमा नदीकाठीही पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील गावांची चिंता त्यामुळे वाढली आहे. उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सोमवारी (ता. २९) भीमा नदीत पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. दुपारी एकच्या सुमारास उजनी धरणातून भीमा नदीत १ लाख ५ हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. या पाण्यामुळे भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेली आहेत. तसेच पंढरपुरात नदीच्या घाटापर्यंत पाणी पोचले आहे. .ठळक मुद्देआळजापूर (ता. करमाळा) येथील करमाळा-जामखेड रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच बंद झाली आहे.करमाळ्यातील खडकी, आळजापूर, तरडगाव, पोटेगाव, संगोबा येथील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत.करमाळ्यातील बोरगाव, पोटेगाव, घारगाव, पाडळी, तरडगाव, दिलमेश्वर, बाळेवाडी या गावांचा करमाळ्याशी संपर्क तुटला.मोहोळ ते मलिकपेट, मोहोळ ते नरखेड, नरखेड ते बोपले मार्ग बंद.सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटीचा पूलही बंद होण्याची शक्यताउत्तर सोलापुरातील तिऱ्हे, शिवणी, पाकणी, पाथरीत पुन्हा पाणी शिरू लागले.दक्षिण सोलापुरातील हत्तूर, औराद भागातही अशीच स्थितीमाढ्यातील वाकाव, केवड, उंदरगाव, दारफळ सीना येथील महापूराची स्थितीत वाढप्रशासनाकडून एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनातसोलापूर, लातूर, सांगली जिल्ह्यातूनही पथके मदतीसाठी दाखल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.