Chhatrapati SambhajiNagar News: यंदा अतिवृष्टी, पूरपरिस्थितीने जिल्हाभरात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. उभी पिके वाहून गेलीच, परंतु जमिनीही अक्षरशः खरडून गेल्या आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित सहा लाख ४४ हजार ६४९ पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली, दिवाळीपूर्वी थेट खात्यात जमा करण्याचेही आश्वासन दिले. मात्र, १४ नोव्हेंबरअखेर केवळ तीन लाख ६२ हजार ०४२ शेतकऱ्यांच्या खात्यात २७४ कोटी ६६ लाख रुपयांची प्रत्यक्ष आर्थिक मदत जमा झाली आहे. अद्यापही दोन लाख ८२ हजार ६०७ शेतकरी मदतीपासून वंचित आहेत..जिल्ह्यात एकट्या सप्टेंबरमध्ये पाच लाख १९ हजार ४६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सर्वांत जास्त नुकसान सिल्लोड, पैठण आणि कन्नड तालुक्यांत झाल्याचे समोर आले होते. राज्य सरकारने दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत जाहीर करत जिल्ह्यासाठी ४८० कोटी १७ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यापैकी आजवर तीन लाख ६२ हजार ४२ शेतकऱ्यांना २७४ कोटी ६६ लाख ७१ हजार रुपयांचा निधी डीबीटी पद्धतीने वितरित करण्यात आला आहे..Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना एकरी ५० हजारांची मदत द्या .मदत मिळाल्यांचीटक्केवारी ५७प्रशासनाकडून अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १४ नोव्हेंबरअखेर चार लाख ८९ हजार ५३० शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या आहेत, तर प्रत्यक्ष तीन लाख ६२ हजार ४२ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष २७४ कोटी ६६ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या तुलनेत ५७. २० टक्के शेतकऱ्यांनाच ही मदत मिळाली आहे.अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी किंवा ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. कन्नड तालुक्यात ३१ हजार शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही..Tree Plantation : नाशिक जिल्हाभरात एकाच दिवशी १ लाख ८८ हजार वृक्षरोपण.तालुका शेतकरी बाधित क्षेत्र (हेक्टर)अपर संभाजीनगर सहा हजार ५५२ पाच हजार ३६७ग्रामीण संभाजीनगर ७६ हजार ३७ ४९ हजार ७२५पैठण ८८ हजार ८३२ ७५ हजार ३०१फुलंब्री ५७ हजार ४९५ ३६ हजार १६५वैजापूर एक लाख १५ हजार ७३९ ९० हजार ९७६.गंगापूर ७१ हजार ५५८ ५८ हजार ५८९खुलताबाद २३ हजार ७३३ २६ हजार ९०९सिल्लोड ८० हजार ८१८ ७८ हजार ७६कन्नड ९४ हजार ३५० ७० हजार ७६१सोयगाव २९ हजार ५४४ २७ हजार ५९१एकूण सहा लाख ४४ हजार ६४९ पाच लाख १९ हजार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.