Beed News : सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दिवाळीच्या तोंडावर सरकारने नुकसानभरपाईचा निधी जाहीर केला असला तरी ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित राहणार आहे. शासनाने ५७७ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी जिल्हा प्रशासनाने केलेल्या ६४५ कोटी रुपयांच्या मागणीपेक्षा हा निधी ६८ कोटींनी कमी आहे..जिल्हा प्रशासनाने ८ लाख ५७ हजार १७१ बाधित शेतकऱ्यांचा अहवाल शासनाला सादर केला होता. मात्र मंजूर निधी केवळ ८ लाख ६ हजार शेतकऱ्यांपुरताच आहे. यामुळे उर्वरित ४९ हजार शेतकऱ्यांना आणि तीन हेक्टर किंवा अधिक शेती असलेल्या शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात मदतीसाठी वाट पाहावी लागणार आहे..जिल्ह्यातील १२१३ गावांना अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसला आहे. खरीप पिके, फळबागा, बागायती शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे त्यांचा अहवाल पुढील वेळी सादर केला जाणार आहे..Crop Damage Compensation : सप्टेंबरमधील पीकनुकसानीपोटी ६४ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरणास मंजुरी .मदत वाटप प्रक्रिया सुरूशासनाने निधी मंजूर केल्यानंतर, शेतकऱ्यांची ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माहिती अपलोड होताच भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. शुक्रवारी (ता. १७) सायंकाळपर्यंत ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली होती..अधिक मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षातीन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने शासन निर्णय काढला असला, तरी प्रत्यक्षात सध्या केवळ दोन हेक्टरपर्यंतच मदत दिली जात आहे. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना आणि अद्याप मदतीपासून वंचित शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे..Crop Damage Compensation : लातूर तालुक्यात १७ कोटींचे वाटप.हजारो विहिरी बुजल्या, जमिनी खरडल्यामहापुरात सुमारे २ हजार विहिरी पूर्णपणे बुजून गेल्या आहेत. अनेक ठिकाणी शेती, रस्ते, घरे, वीज खांब, शाळा खोल्या व बंधारे वाहून गेले. नदीकाठची जमीन गाळासकट खरडून गेली, परिणामी शेतीचे पाळेही उरले नाहीत. अनेक ठिकाणी पशुधन मृत्यू, घरांचे नुकसान, वीज पडून मृत्यू अशा घटनाही घडल्या आहेत..असे झाले नुकसानजिरायत शेती : ६,९३,८१० हेक्टरबागायती क्षेत्र : १०,९९४ हेक्टरफळपिके : १६,२६८ हेक्टर.अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी प्राप्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे त्यांनी ई केवायसी करण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांनी सीसीएसी सेंटरवरुन ई केवायसी करावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी सीएससी सेंटर, तलाठी कार्यालयात लावण्यात येईल. कोणा शेतकऱ्यांना काही तक्रार असेल तर टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधावा.- विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, बीड..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.