Nanded News : ढगफुटी व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, मुखेड तालुक्यातील लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली असून काही गावांमध्ये नदीचं पाणी घुसले आहे. .पुनर्वसित रावणगाव, भासवाडी, भिंगोली व हसनाळ या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. मुखेड तालुक्यातत खालील गावांमध्ये शोध व बचाव कार्य चालु आहे..Heavy Rain: अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत.रावनगाव येथे अंदाजे २२५ नागरिक पाण्याच्या वेढ्यात अडकलेले आहेत. पैकी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अडकलेले ७-८ जणांना सुखरूप वाचवले आलेले आहे. मस्जीधदवर अंदाजे १५-१६ नागरिक अडकलेले आहेत त्यांडचा शोध व बचावाची कार्यवाही पथकांकडून चालु आहे. हसनाळ येथे अंदाजे ७-८ नागरिक अडकलेले आहेत त्यांचा शोध व बचावाची कार्यवाही पथकांकडून करण्यात आली आहे..Nanded Heavy Rain: नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर, हसनाळ गावामध्ये लष्कर दाखल.भासवाडी येथे सुमारे २० नागरिक सुरक्षित आहेत, बचाव कार्य चालू आहे. भिंगोली येथे सुमारे ४० नागरिक सुरक्षित आहेत, बचाव कार्य चालू आहे. हे सर्व नागरिक पूरस्थितीत अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या शोध व बचाव पथकाच्या एसडीआरएफ राज्य आपत्ती प्रतिसाद दल, पोलिस, अग्निशमन दल, क्युआरटी (सिघ्र प्रतिसाद दल) व स्थानिक शोध व तत्परतेमुळे यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्वजण सुरक्षित आहेत..जिल्हासधिकारी राहुल कर्डिले स्वतः जातीने लक्ष ठेऊन आहेत तसेच उपविभागीय अधिकारी देगलूर व तहसीलदार मुखेड हेही घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्य करत आहेत. जिल्हा प्रशासन पूर्णतः सतर्क असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.