Nanded News : पाणी घरात शिरले आणि संसार उघड्यावर आला... आता जगायचे कसे? हा हतबल सवाल सध्या नांदेड शहरातील नदीकाठच्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसत आहे. गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या पुराच्या पाण्याने अनेक कुटुंबांचा संसार वाहून गेला. काही तासांतच आयुष्यभराच्या कष्टाची जमा केलेली संपत्ती, घरातील धान्य, फर्निचर, कपडे, मुलांची पुस्तके, शाळेच्या दप्तरांसह रोजच्या वापरातील सर्वच वस्तू पाण्यात भिजल्या..गोदावरीचे पाणी शुक्रवारी सकाळी किंचित खाली आले असले तरी लोकांचे मन मात्र अजूनही भीतीने दडपून गेले आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये जागोजागी पाणी शिरलेले असून नागरिकांना उघड्यावर आसरा घ्यावा लागत आहे. काहींनी शेजाऱ्यांकडे, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी आसरा घेतला आहे. मुलांच्या हातातील दप्तरं, महिलांच्या डोळ्यातील पाणी आणि वृद्धांच्या चेहऱ्यावरची असहायता ही पूरग्रस्त वस्त्यांची खरी कहाणी सांगून जाते..Nanded Flood Rescue : पुरात अडकलेल्या ६६ नागरिकांना काढले बाहेर .दरम्यान, शहराबरोबरच ग्रामीण भागातही पावसाने थैमान घातले आहे. विष्णुपुरी प्रकल्पातून तब्बल दीड लाख क्यूसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. १६ गेट्स उघडण्यात आले असून शुक्रवारी सकाळपर्यंत प्रकल्पातील पाणीसाठा २३.२५ दलघमी (२८.७८ टक्के) इतका नोंदविण्यात आला. अप्पर मानार प्रकल्प ९३.९९ टक्क्यांपर्यंत भरला असून दोन गेट्समधून ३१४२ क्यूसेक पाणी सोडले जात आहे. लोअर मानार प्रकल्प तर शंभर टक्के क्षमतेने भरला असून पाणी ओसंडून वाहत आहे. दिग्रस बंधाऱ्यातून तब्बल ६८ हजार ४९२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. .Nanded Flood: नांदेडमध्ये पूरस्थितीमुळे ४९८ जनावरे मृत्युमुखी.अतिवृष्टीने सर्व हिरावून नेलेया सततच्या विसर्गामुळे गोदावरी नदीकाठच्या खालच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक रस्ते वाहून गेले, शेतांमध्ये पाणी साचले, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे असलेले पीक काही क्षणांत पाण्याखाली गेले. या सगळ्या परिस्थितीत गरीब कुटुंबांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत..घरातल्या धान्याचा एकेक दाणा जपून ठेवला होता, तोही पाण्यात भिजून खराब झाला. मुलांसाठी घेतलेली पुस्तकं, कपडे वाहून गेले. आता पुढे कसे जगायचे, हा मोठा प्रश्न आहे.- शोभा गायकवाड.पुराचे पाणी हळूहळू ओसरत असले तरी जखमा खोलवर झाल्या आहेत. संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा नागरिक करत आहेत. मदतीचे आश्वासन मिळत असले तरी तोपर्यंत उपाशीपोटी रात्र काढावी लागणाऱ्या कुटुंबांचे हाल कल्पनेपलीकडचे आहेत.-देविदास सोनवणे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.