Beed News : माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाला सिंदफणा आणि गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याने विळखा घातल्याने शेतकऱ्यांची जोमात आलेली पिके वाहून गेलीच, पण त्यासोबत शेतकऱ्यांच्या आशाही पुरामध्ये बुडाल्या. हाती येणारे दिवाळीचे उत्पन्न हिरावले गेले असून, आता पुढील भविष्यासाठी ‘काय आणि कसं करायचं’, असा प्रश्न उभा ठाकला आहे..पूर ओसरून आठवड्याहून अधिक काळ लोटला, तरी गावातील जनजीवन अजूनही विस्कळित आहे. वीजपुरवठा खंडित आहे, पुलांचे तुकडे पडले, रस्ते खोल गटारांमध्ये रूपांतरित झाले आणि विद्यार्थी, महिला, वृद्ध यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. .Maharashtra Flood Relief Package: अतिवृष्टिग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी.आजही गाव अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित असून, गेल्या चाळीस वर्षांपासून सांडस चिंचोलीचे पुनर्वसन केवळ शासनाच्या लालफितीत अडकून राहिले आहे. बालासाहेब भोसले, बालासाहेब शेजूळ, सोमेश्वर चंदनशिव, नारायण शेजूळ यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शासनाने तातडीने परिस्थितीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. .पूर आल्याशिवाय कोणालाही आठवण येत नाही पूर आला, की शासनाला आणि लोकप्रतिनिधींना गावाच्या पुनर्वसनाची आठवण येते. पूर ओसरला की पुन्हा सर्व विसरले जाते. हा प्रश्न वर्षानुवर्षे तसाच प्रलंबित आहे. गावाच्या पुनर्वसनासाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत..Maharashtra Flood Damage: पुरामुळे लाखांहून अधिक पशुधनाचा बळी.शासनाकडून ठोस उपाययोजना अपेक्षितसांडस चिंचोलीसारखी गावे दरवर्षी पुराच्या झळा सहन करत असूनही, शासनाकडून त्यांच्या पुनर्वसनासाठी अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तातडीने रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा पूर्ववत करणे, शैक्षणिक वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत निर्णय घेणे हे सरकारपुढे प्राधान्याचे प्रश्न आहेत..पूर आल्यावरच शासनाला गावाच्या पुनर्वसनाचे ध्यान होते. एरव्ही मात्र कुणी ढुंकूनही बघत नाही. यंदा भयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. दिवाळीला सोयाबीन, कपाशीचे हाती येणारे उत्पन्न पुराने वाहून नेले. आता पुढे काय करायचं आणि कुठवर कर्ज काढायचं?- श्रीकृष्ण शेजूळ, शेतकरी .दिवाळी गोड होईल अशी आशा होती. काही चार पैसे हाती येतील, असा विचार होता. पण, तसे झालेच नाही. शासनाने तुटपुंजी मदत जाहीर केली आणि ती मिळायलाही वेळ लागत आहे. नुकसान भरपाई योग्य आणि तातडीने मिळाली पाहिजे.- शुभम भोसले, ग्रामस्थ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.