Solapur News : यंदाच्या अतिवृष्टीने महाराष्ट्राचा चेहरा विदीर्ण करून टाकला आहे. कोसळलेल्या घरांचे अवशेष, वाहून गेलेल्या शेतजमिनी आणि रिकामे गोठे ही दृश्ये मन हेलावून टाकतात. हजारो कुटुंबांचे आयुष्यभराचे श्रम एका पावसात वाहून गेले. .शासनाने मदत जाहीर केली असली तरी, इतके मोठे नुकसान केवळ आर्थिक आधाराने भरून निघणारे नाही. यासाठी दीर्घकालीन, ठोस आणि शाश्वत उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे. तरच हा अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्र पुन्हा नव्या ताकदीने उभा राहणार आहे..शेतकऱ्यांच्या चर्चेतील काही पर्यायतातडीची पुनर्बांधणी योजना : नद्या व ओढ्यातील गाळ काढून माती शेतात भरणे, बंधारे उभारणे आणि जलसंधारणाच्या कामांना गती मिळाली, तर वाहून गेलेली जमीन पुन्हा उत्पादनक्षम बनेल..Kharif Crop Damage : आटपाडीत अतिपावसामुळे खरीप कुजला .शेतकऱ्यांना आर्थिक आधार : विशेष मदतपॅकेज, कर्जमाफी आणि अनुदानित बियाणे-खते दिल्यास शेतकरी नव्याने उभारी घेऊ शकेल.पिकविमा आणि आपत्ती व्यवस्थापन बळकट करणे : विमा दावे वेळेत मिळाले पाहिजेत आणि गावोगावी आपत्ती व्यवस्थापन समित्या सक्रिय झाल्या, तर पुढील संकटात शेतकऱ्यांचा आत्मविश्वास ढळणार नाही..पर्यायी रोजगार संधी : शेतीसोबत दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, बागायती आणि लघुउद्योगांना चालना मिळाल्यास शेतकरी कुटुंबाला स्थिर उत्पन्न मिळेल आणि उपजीविकेचे नवे मार्ग उघडतील.शेतमालाचे भाव : शेतमालाचे भाव वाढवणे ही आता काळाची गरज बनली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे राहणार आहेत ..Crop Damage Compensation : हिंगोली जिल्ह्यासाठी २३५ कोटी मंजूर.मानसिक व सामाजिक पुनर्बांधणी : शेतकऱ्यांच्या मनोबलासाठी समुपदेशन शिबिरे, समाजात एकोपा आणि आशेचे संदेश पेरणे आवश्यक आहे.आज महाराष्ट्राची खरी गरज फक्त मदतीची नाही, तर उभारीची आहे. शासनाने हे पर्याय गांभीर्याने विचारात घेतले, तर अतिवृष्टीग्रस्त महाराष्ट्र पुन्हा उभा राहील आणि आधीपेक्षा अधिक बळकट बनेल..पाणी सगळं वाहून घेऊन गेले. आमचे चार एकर ऊसाचे क्षेत्र वाहून गेले. तरीही आमची आशा अजून वाहून गेलेली नाही. सरकारने जर पाठबळ दिलं, तर आम्ही पुन्हा उभं राहू आणि पेरणी करू नव्या विश्वासाने.- नितीन वाघमारे, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, उंदरगाव, ता. माढा, जि. सोलापूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.