Latur News : तालुक्यातील सर्व आठ महसूल मंडळांत ऑगस्ट महिन्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली. तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, तर शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. .प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, एकूण ५२ हजार ७८० शेतकऱ्यांच्या ३६ हजार १११ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार राम बोरगावकर यांनी दिली. उदगीर तालुक्यात आठ ऑगस्ट रोजी काही मंडळांत अतिवृष्टी झाली होती, तर १८, २८ व २९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील सर्वच मंडळांत जोरदार पाऊस होऊन अतिवृष्टी झाली. .Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५७४ कोटींची मागणी .धडकनाळ व बोरगाव परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदीला दोनवेळा महापूर आला होता. दोन्ही गावांतील नदीकाठच्या शेतकऱ्यांची एकूण २२९.०५ हेक्टर शेतजमीन खरडून गेली, तर दोन्ही गावांतील ७११ शेतकऱ्यांच्या ४०२.१८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले; तसेच दोन्ही गावांतील ३०० पशुधन या नदीच्या महापुरात वाहून गेले. .ऑगस्ट महिन्यात तीनवेळा तालुक्यातील सर्वच भागांत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे..Rain Crop Damage : सातारा जिल्ह्यात पावसाने तीन कोटी २३ लाखांचे नुकसान.तालुक्यातील सर्व साठवण तलाव, लघू पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत.उदगीर तालुक्यात एकूण ६६ हजार ६८९ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी ६२ हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली आहे..मंडळनिहाय बाधितशेतकरी संख्यामंडळाचे नाव शेतकरी संख्या१ वाढवणा बु. ६,४२३२ नळगीर ७,९५९३) देवर्जन ७,६५०४) नागलगाव ८,०७३५) मोघा ६,३३८६) उदगीर ३,०५९७) तोंडार ५,७८१८) हेर ७,४९७एकूण ५२,७८०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.