Mumbai News: मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बेहाल झालेले शेतकरी आणि नागरिक सरकारी मदतीची आस लावून बसले असताना मंगळवारी (ता. ३०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ काथ्याकूट करण्यात आला. पुढील काही दिवसांत पंचनामे करून त्यानंतरच मदत दिली जाईल. ही मदत दिवाळीपूर्वी देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली..गेल्या आठवड्यापासून राज्यातील विविध ठिकाणचे मंत्र्यांनी केलेले दौरे आणि केलेली वक्तव्ये पाहता मदत दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र निकष आणि पंचनाम्यांचा कोलदांडा घालून ती पुढे ढकलण्यात आली. शिवाय मंत्र्यांनी केलेले दौरे केवळ तोंडदेखले होते अशी टीका विरोधकांनी केली आहे..तसेच ओला दुष्काळ ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. त्यामुळे दुष्काळामध्ये ज्या सवलती दिल्या जातात त्या सवलती दिल्या जातात त्या तत्काळ लागू करण्यात येतील, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. अतिवृष्टीमुळे राज्यातील ६० लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नागरी वस्ती, फळबागा, विहिरी, मोटारपंप, महावितरणचे जाळे आणि अन्य बाबींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..Nashik Flood: नाशिकमध्ये अतिवृष्टीच्या तडाख्यात शिवारांची दुर्दशा.मराठवाड्यातील धाराशीव, बीड, सोलापूर, नांदेड, अहिल्यानगरसह अन्य ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. सीना, गोदावरीसह अन्य मोठ्या नद्यांना महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. परिणामी त्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. ही मदत मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केली जाईल अशी अपेक्षा होती. .मात्र, बैठकीत केवळ काथ्याकूट करण्यात आला. ओला दुष्काळ अशी कोणतीही संकल्पना नाही. त्यामुळे तशी मदत देण्यात अडचणी आहेत. त्यामुळे दुष्काळामध्ये ज्या सवलती आहेत त्या सवलती आता देण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पीककर्ज वसुलीला स्थगिती, जमिन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला माफी परीक्षा फी प्रतिपूर्ती, शेतीपंपांची वीज जोडणी खंडित न करणे यांसह अन्य सवलती दिल्या जाणार आहेत..Crop Damage Compensation : अतिवृष्टी नुकसान मदतीसाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक.या बाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारकडून २ हजार २१५ कोटी रुपयांचे वाटप सुरू आहे. ज्याप्रकारे नुकसान झाले आहे ते पाहता सामूहिक धोरण तयार करून पुढील आठवड्याभरात मदत जाहीर केली जाईल. दिवाळीआधी ही मदत शेतकऱ्यांना दिली जाईल. ही मदत देताना शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याची गरज नाही. त्यासाठी आम्ही ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी झालेल्या डाटाची मदत घेऊन खात्यावर पैसे जमा करू. .महाराष्ट्रात सातत्याने अतिवृष्टी होत आहे. त्याचा आढावा आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. पुढील दोन तीन दिवसांत पंचनामे होतील. काही ठिकाणी अजूनही पाणी आहे. त्यामुळे संपूर्ण पंचनामे झाल्यानंतर योग्य आकडेवारी आली की त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठविला जाईल. केंद्राची मदत येण्याची आम्ही वाट पाहणार नाही. त्याआधीच मदत सुरू केली आहे. विहिरी, घरे आणि अन्य मदतीचे निकष शिथिल करून मदत केली जाईल. त्यासाठी आम्ही सर्वसमावेशक धोरण तयार करत आहोत. ही मदत त्यानंतर शेतकऱ्यांना दिली जाणार आहे..भरपाईवरून चर्चामंत्रिमंडळ बैठकीत प्रति हेक्टरी किती मदत करायची यावर खल झाला. प्रति एकरी मोठी मदत देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासाठी १५ ते २० हजार कोटी रुपयांची गरज लागणार आहे. मदतीच्या आकडेवारीबद्दल मंत्र्यांनी बाहेर वाच्यता करू नये, अशी सूचना दिल्याने त्याबाबत सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत..दिल्लीची वाट पाहणार नाहीपंचनामे पूर्ण झाल्यानंतर आम्ही मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवू. त्याची वाट पाहत नाही. त्याआधी आम्ही मदत सुरू केली असून केंद्राची मदत भरपाईपोटी मिळेल. नुकसानीची आढावा घेण्याचे काम वेगाने सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.