Solapur News : पूर आणि अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचे बहुतांश पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे सोमवारपर्यंत (ता.१३) पूर्ण होतील. त्यानंतर जिल्ह्याची एकत्रित नुकसान आकडेवारी शासनाकडे सादर केली जाईल. .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली..Crop Damage Compensation : अहिल्यानगरच्या तेरा तालुक्यांत नुकसानीपोटी मिळणार मदत.आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आदी उपस्थित होते. पालकमंत्री गोरे म्हणाले, “पूरग्रस्त कुटुंबांनाही दिवाळी साजरी करता यावी, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ११५ गावांतील ११ हजार ८०५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचे दिवाळी किट वाटप करण्यात येणार आहे. .शासनाकडून या वाटपाचे नियोजन पूर्ण झाले असून, दिवाळीपूर्वी सर्व कुटुंबांपर्यंत किट पोहोचतील. एनडीआरएफच्या जुन्या निकषानुसार दोन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळत होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. .Crop Damage Compensation : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शिवसैनिक आक्रमक.या नव्या निकषानुसार जिल्ह्यातील पंचनामे सुधारित केले जात आहेत. सोमवारपर्यंत ही आकडेवारी शासनाला सादर केली जाईल,” असे गोरे यांनी स्पष्ट केले. पूर्वी फक्त तीन जनावरांच्या मृत्यूपर्यंत मदत मिळत होती. मात्र आता जितक्या जनावरांचा मृत्यू झाला आहे, त्या सर्वांसाठी मदत देण्यात येईल, असा निर्णयही शासनाने घेतला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला..जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टीक्षेपातअतिवृष्टी महसूल मंडळे ः ८०बाधित गावांची संख्या ः ८७१बाधित कुटुंबे ः १२,३००बाधित नागरिक ः ४ लाख ६९ हजारबाधित शेतकरी ः ४ लाख ६१ हजारबाधित क्षेत्र ः ४५,६३७ हेक्टरबाधित पशुधन ः १,८६८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.