Kettu News: उजनी धरण क्षेत्रातील प्रमुख आकर्षण असलेले रोहित (फ्लेमिंगो) हे मनमोहक स्थलांतरित पक्षी यंदा उजनी जलाशयाकडे फिरकलेच नसल्याचे चित्र दिसत आहे. थंडीची चाहूल लागताच हजारो मैलांचा प्रवास करून दरवर्षी मोठ्या संख्येने येथे येणारे हे हिवाळी पाहुणे यंदा फेब्रुवारी अखेरपर्यंतही दाखल झाले नाहीत. .पांढऱ्या शरीरावर गुलाबी छटा असलेल्या या मनमोहक हिवाळी पाहुण्यांचे आगमन धूसर झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी ‘सकाळ’ला दिली. नुकताच धरणातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग केल्यानंतर डॉ. कुंभार यांनी धरण परिसरातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करून ही माहिती दिली..Bird Migration: उजनीच्या परिसरात ‘गुलाबी’ पाहुण्यांची मांदियाळी.यावर्षी अतिवृष्टीमुळे उजनी जलाशय जुलै महिन्यातच पूर्ण भरला होता. नंतर कालवे, सीना-माढा बोगदा व भीमा नदीमार्गे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता..मात्र, जलाशय काठावरील भाग दीर्घकाळ पाण्याखाली गेल्याने त्यांच्या आगमनाला विलंब होईल, असेही पक्षी अभ्यासकांनी नमूद केले होते. गेल्या दीड महिन्यात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने काठावरील दलदली व जलावृत्त बेटे उघडी पडली असली, तरी फ्लेमिंगोंनी अद्याप येथे हजेरी लावलेली नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.