Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला कर्ज परतफेडीसाठी किडनी विकावी लागल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच सावकारांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सहा सावकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. एक सावकार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे..किशोर बावनकुळे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपुरे आणि सत्यवान बोरकर अशी कोठडी सुनावलेल्या सावकारांची नावे आहेत. तर मनीष घाटबांधे हा सावकार अद्याप फरार आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे. मानवी अवयवांच्या तस्करीचे हे प्रकरण असू शकते, असा निष्कर्ष प्राथमिक तपासात समोर आला आहे. नागभीड परिसरातील ग्रामीण भागात आणखी कुणी किडनी विकली का, याचाही तपास सुरू आहे..Illegal Money lenders : रिसोड तालुक्यात अवैध सावकारांवर कारवाई.दरम्यान, आता एअरपोर्ट अथॉरिटींकडून कुडे यांची ट्रॅव्हल हिस्ट्री पोलिसांनी मागविली आहे. त्यांचा मोबाइल ताब्यात घेऊन सीडीआर तपासणे सुरू आहे. यातून ते नेमके कुणाच्या संपर्कात होते, हे स्पष्ट होईल. किडनी विकल्यानंतर त्यांच्या खात्यात आठ लाख रुपये जमा झाले. मात्र ते नेमके कुठून आले, याचा तपास अद्याप शिल्लक आहे. दरम्यान, कुडे यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यांना पैशाची ऑफरही देण्यात आली. त्यामुळे आता पोलिसांनी त्यांना सुरक्षा पुरविली आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची सोनोग्राफी करण्यात आली. त्याचा अहवाल आल्यानंतर किडनी प्रकरणातील सत्यतेवर शिक्कामोर्तब झाले..किडनी डोनर कम्युनिटीपैशासाठी किडनी विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोशन कुडे यांनी फेसबुकवर ‘किडनी डोनर कम्युनिटी’ शोधली. त्यावर किडनी दान करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर चेन्नई येथील डॉ. कृष्णा यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. डॉ. कृष्णा यांनीच पाठविलेल्या तिकिटाने कुडे गीतांजली एक्स्प्रेसने कोलकाता येथे पोहोचले. तिथे डॉ. कृष्णा यांच्या माणसांनी कुडेंना एका वैद्यकीय प्रयोगशाळेत नेऊन रक्ताचे नमुने घेतले व त्यानंतर त्याचा पासपोर्ट काढण्यात आला. या पासपोर्टवर वीस दिवसांचा कंबोडियाचा शिक्का असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. कंबोडिया येथील नॉम पेन्ह या शहरात १४ ऑक्टोबर २०२४ रोजी कुडे यांच्यावर किडनी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दहा दिवसांनी ते मूळ गावी परत आले..Illegal Money Lending : कायदा होऊनही अवैध सावकारीचा 'फास' कायम.या वर्षी लाओसचीही विदेशवारीपोलिस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. जून २०२५ मध्ये रोशन कुडे लाओस या देशाची राजधानी व्हियांतियान येथे गेले होते. तिथल्या एका कॉल सेंटरमध्ये त्यांनी १७ दिवस नोकरी केली. त्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले..डोक्यावर बसले कर्जावर कर्जचंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुडे यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी ब्रह्मपुरी येथील एका सावकाराकडून एक लाखाचे कर्ज घेतले. त्यापैकी पंधरा हजार रुपये ३१ मार्च २०२१ रोजी त्याने सावकाराला परत दिले. परंतु उर्वरित ८५ हजारांच्या कर्जाची फेड करण्यासाठी त्याने वाढीव मुदत मागितली. त्यावर सावकाराने २० टक्के प्रमाणे व्याज आणि प्रति दिवस पाच हजारांचा दंड आकारला. ते चुकविण्यासाठी कुडे यांनी वेगवेगळ्या सावकारांकडून आणखी व्याजाने मोठी रक्कम उचलली. आतापर्यंत त्यांनी ४८ लाख ५३ हजार रुपये सावकारांना कर्जापोटी परत केले. त्यानंतर उर्वरित कर्ज चुकविण्यासाठी कंबोडियाला जाऊन किडनी विकली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.