Pune News: उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर वन विभागांतर्गत जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरमधील वाढत्या मानव-बिबट्या संघर्षावर उपाययोजना म्हणून सुमारे ५०० बिबटे तातडीने पकडून गुजरातच्या वनतारा येथे पाठविण्यात येणार आहे. त्याबरोबरच स्पेशल लेपर्ड फोर्स स्थापन करण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारी (ता.४) मुंबईत वनमंत्र्यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला..या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वनाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बिबट्यांची नसबंदीचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत चर्चा करणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली परिसरातील लोकप्रतिनिधीसमवेतचे एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना भेटणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. .तसेच एआय तंत्रज्ञाचे अलर्ट सिस्टिम व सौरऊर्जा कुंपणाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बिबटे तातडीने पकडण्यासाठी १ हजार पिंजऱ्यांची निर्मिती आणि खरेदीसाठी १० कोटी रुपये आजच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले..Leopard Attack: बिबट्याला ठार करा, शेतकरी संतप्त.विदर्भातील योजना जुन्नर विभागात राबविणारविदर्भामध्ये वाघ आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्यात आल्या, त्या सर्व उपाययोजना बिबट प्रवण क्षेत्रामध्ये करण्यात येणार असल्याचेही वनमंत्री नाईक यांनी सांगितले..विविध योजनांमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी सौरकुंपण योजनेंतर्गत १०० टक्के सवलतीमध्ये शेतकऱ्यांना देणार आहे. बिबट्या व मानव संघर्ष टाळण्यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे वाहने, टॉर्च, एआय सिस्टिम या सर्व गोष्टी पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्या अंमलबजावणीबाबत बैठकीत चर्चा झाली..५३ शेतकऱ्यांचा मृत्यूबिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जुन्नर वनविभागात ५३ शेतकरी आणि अपत्यांचा मृत्यू झाला आहे. १४५ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. २६ हजार ९७९ पशुधनांचा मृत्यू झालेला आहे. नुकसान भरपाईपोटी २६ कोटी, ७२ लाख ५६ हजार ७०३ रुपये इतकी भरपाई देण्यात आल्याचेही श्री. नाईक यांनी सांगितले..Leopard Human Conflict: मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी राज्यस्तरीय धोरण : अजित पवार.शेड्यूल्ड- २ मध्ये आणण्यासाठी प्रयत्नबिबट वन्यजीवांच्या अनसूची (१) नुसार संरक्षित प्राणी आहे. यामुळे त्याच्या बद्दल कोणताही निर्णय घेताना कायदेशीर अडचणी निर्माण होतात. यामुळे बिबट्या अनुसूची-१ मधून २ मध्ये आणण्यासाठी केंद्रीय कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत केंद्राला विनंती करण्यात येणार असल्याचेही श्री. नाईक यांनी सांगितले..पुण्यात आढावा बैठकमंगळवारी झालेल्या बैठकीत वरील सर्व निर्णयांचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री नाईक यांच्या उपस्थितीत १२ नोव्हेंबरला दुपारी ३ वा. विधान भवन, पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले..संवेदनशील बैठकीला आमदार, खासदार अनुपस्थितबिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमध्ये शेतकरी आणि लहान मुलांचा होणाऱ्या संवेदनशील प्रश्नी वनमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीला आमदार शरद सोनवणे आणि खासदार अमोल कोल्हे अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे..‘ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करू नका’पिंपरखेड (ता.शिरूर) येथे प्रक्षुब्ध जमावाने आक्रोशातून वन विभागाचे वाहन व कार्यालयाला आग लावली असली तरी संबंधितांवर कारवाई करण्यात येऊ नये, अशा सूचना श्री. नाईक यांनी दिल्या..पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जुन्नर वन विभागात सुमारे १ हजार ७०० बिबटे असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. ही वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी काही बिबटे पकडून निवारा केंद्रांमध्ये पाठविण्याबरोबरच नसबंदी आणि प्रसंगी मारण्याचे आदेश केंद्र शासनाकडून घेण्यासाठी आम्ही केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यांच्या सूचनेनंतर त्यावर उपाययोजना केल्या जातील.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.