Ahilyanagar News: अतिवृष्टी, पुर आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचे, शेतजमिनींचे आणि घरांचे देखील मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ४ लाख ७६ हजार ३५ बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकूण ५१६ कोटी ९८ लाख रुपये खात्यावर जमा केले आहेत. राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकर रक्कम मिळेल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले..अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा मे महिन्यापासूनच सतत पाऊस पडत आहे. सप्टेंबर महिन्यात तर अक्षरशः शेतीची वाताहात झाली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, पुर आणि जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाभरात ८ लाख ४९ हजार ७१६ शेतकऱ्यांचे ६ लाख १५ हजार हेक्टरवरील पिकांचे तसेच शेतीचे, घराचे, पिकांचे नुकसान झाले आहे..Ativrushti Madat: अतिवृष्टिग्रस्तांसाठी २५४० कोटी मदत.जिल्ह्याची पावसाची सरासरी ४४८.१ इतकी आहे. यापैकी ऑक्टोबर अखेरच्या कालावधीत जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत १२७.२ टक्के (६५७.२ मिमी) पाऊस कोसळला आहे. यापैकी सप्टेंबर महिन्यात ३०७ मिलिमीटर पाऊस झाला. .Farmer Relief Fund : अतिवृष्टिग्रस्तांच्या मदतीसाठी निधी तयार; आज मुंबईत बैठक.त्यानंतर ऑक्टोबर आणि सध्या सुरू असलेल्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडत आहेत. या मुसळधार पावसाने शेत शिवार, रस्ते, घरे, पीकपाणी उद्ध्वस्त झाले. शासन निर्देशानुसार या नुकसानीचे पंचनामे झाले..तालुकानिहाय शेतकरी संख्या व कंसात वितरित निधीअहिल्यानगर ः ३४,३५० (३८ कोटी ४४ लाख ३२ हजार), नेवासा ः ५८,६२० (७१ कोटी ६५ लाख ५८ हजार), श्रीरामपूर ः २६,३७७ (२६ कोटी २६ लाख ३० हजार), राहुरी ः ४१,६९० (४४ लाख ६९ लाख १९ हजार), कोपरगाव ः ३०,५५६ (२४ लाख ७० लाख ७८ हजार), राहाता ः ३०,८७३ (२९ कोटी ९६ लाख १६ हजार), संगमनेर ः१७,३०२ (१४२ कोटी २३ लाख २२ हजार), .अकोले ः १०५९ (३५ लाख ८८ हजार), पारनेर ः३५,४१७ (३१ कोटी ६५ लाख ७५ हजार), श्रीगोंदा ः ४०,१५४ (३९ कोटी ७४ लाख ३४ हजार), कर्जत ः ४३,२५१ (५६ कोटी ०९ लाख ७६ हजार). जामखेड ः ३१,७४७ (२९ कोटी ८३ लाख ७३ हजार),पाथर्डी ः ४१,८७३ (५० कोटी १४ लाख ५३ हजार), शेवगाव ः ४२,७६० (५९ लाख १८ लाख ९९ हजार)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.