Raigad News : मासेमारीवर दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंदी आदेशांमुळे १ ऑगस्टला कूच करण्यासाठीची तयारी मच्छीमारांनी केली होती, पण समुद्रातील जोरदार वारे, खराब वातावरणाने श्रीवर्धन तालुक्यातील मासेमारीच्या हंगामाला अजून सुरुवातच झालेली नाही. =.श्रीवर्धन तालुक्यात ६२३ मोठ्या बोटी, तर ३०८ लहान बोटी बंदीमुळे किनाऱ्यावर उभ्या होत्या. तालुक्यातील जीवनाबंदर, मुळगाव कोळीवाडा तर तालुक्यात दिघी, कुडगाव, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, बागमांडला परिसरात मच्छीमार व्यावसायिक आहेत. मे अखेर मासेमारीचा हंगामात आर्थिक उत्पन्न मिळते..Illegal Fishing: समुद्रात दहा वावाच्या आत ट्रॉलर्सची घुसखोरी.त्यामुळे दोन महिन्यांच्या कालावधीत उदरनिर्वासाठी आर्थिक नियोजन करावे लागते. काही मच्छीमार व्यावसायिक बंदीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत सुकी मासळी विक्रीतून उदरनिर्वाह करत असतात. .या कालावधीत बोटींच्या इंजिनची कामे, नवीन पार्ट बसवणे, नवीन जाळी बनवणे अशी कामे केली जातात. श्रीवर्धन येथे जवळपास साडेसहा हजार मच्छीमारांना उदरनिर्वाहासाठी धडपड करावी लागते..Fish Price: मासळीच्या दरात सुधारणा.वाहतूक खर्चाचा भारसध्याच्या परिस्थितीत वाहतूक खर्च डोक्यावरून जात असल्याने शहरातील बाजारात जाणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नाही. १ ऑगस्ट रोजी शासनाच्या नियमावलीनुसार मासेमारी हंगाम सुरू झाला, पण सध्याच्या परिस्थितीत समुद्रातील वादळी वारे, लहरी, खराब वातावरणामुळे मासेमारी सुरूच झाली नसल्याने व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे..नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीचा हंगाम सुरू होईल, असे वाटत होते, पण वादळी वारे, खराब हवामानामुळे मासळी अत्यंत कमी प्रमाणात आहे. डिझेल खर्च, खलाशांचा पगार याचा ताळमेळ बसत नाही.- हरिदास वाघे, संचालक, श्रीकृष्ण सहकारी मच्छी व्यावसायिक संस्था.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.