Amravati News: राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपये आर्थिक साह्याचा योग्य विनियोग करून लाभार्थ्यांची जिल्हास्तरीय सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते पतसंस्थेच्या सभासदांना नोंदणीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. जिल्हास्तरावर पतसंस्थेची नोंदणी करण्याची ही राज्यातील पहिली घटना आहे..राज्य शासनाची लाडकी बहीण योजना कार्यान्वित आहे. यात देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक साहाय्यानंतरचे महिलांनी पुढचे पाऊल टाकले आहे. महिलांनी एकत्र येत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी सभासदांची सहकारी पतसंस्था नोंदणी केली आहे. यात सुरुवातीलाच सात हजार ५०० सभासद सदस्य झाले आहेत..Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर–डिसेंबर–जानेवारीचे पैसे एकत्र मिळणार ! .यात २१ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. यातील सभासद संख्येत वाढ होणार आहे. ही संस्था राज्यातील अशा प्रकारची पहिली जिल्हास्तरीय संस्था म्हणून नोंदणीकृत झाली आहे. जिल्हाधिकारी येरेकर यांच्या हस्ते पतसंस्थेच्या प्रवर्तकांना संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले..या वेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. रंजन वानखडे, उपनिबंधक कार्यालयाचे सहायक संचालक अनिरुद्ध राऊत उपस्थित होते. महिलांमधील उद्योजकता वाढीस लागावी म्हणून जिल्हा नियोजनमधून ६०० बचतगटांना प्रत्येकी एक लाख, याप्रमाणे सहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे..Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ई-केवायसी करणार.त्यासोबतच जिल्ह्यात पहिली प्राथमिक सहकारी सेवा संस्था उभारण्यात येणार आहे. यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. यातूनही महिलांमधील उद्योजकता वाढीस लागेल तसेच आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामधूनही कर्ज उपलब्ध होणार आहे. बचतगटांची ही चळवळ जिल्ह्यात खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करणारी ठरणार आहे..या वेळी लाडकी बहीण पतसंस्थेच्या अध्यक्ष रजनी भोंडे, उपाध्यक्ष रेशमा सरदार, कोषाध्यक्ष विद्या धिकार, सचिव ज्योत्स्ना चांगोले, वैशाली चौधरी, सुनीता थोटे, मीना कडव, अनिता वैद्य, पद्मा सरदार, ज्योती बोरकर, भारती वानखडे, संमिता विरूळकर, विद्या काळे, रेखा कासदेकर, शाहीन बानो फिरोज खान, कौसल्या इखे, शीतल डेहनकर आदी उपस्थित होते..महिलांची पतसंस्था नोंदणी होणे ही ऐतिहासिक बाब आहे. लाडकी बहीण योजनेतून मिळणारे साह्य या बँकेच्या माध्यमातून गोळा होणार आहे. कर्ज स्वरूपात देण्यात येणाऱ्या निधीचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे. महिलांचे आर्थिक नियोजन चोख असते. यामुळे पतसंस्थेची आर्थिक शिस्त वाढीस लागेल. त्यासोबतच गरजूंना पतसंस्थेचा लाभ होईल.आशिष येरेकर, जिल्हाधिकारी, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.