Beed News: मराठा आरक्षणाचा शासन निर्णय मंत्रिमंडळाने काढलेला आहे, सध्या आपत्तीचा काळ असल्याने अंमलबजावणीस उशीर होत असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. .त्यामुळे त्यांना आपण आणखी महिनाभराचा वेळ देऊ. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर ‘झेडपी’ निवडणुका नाहीत, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. शेतकरीप्रश्नांवर लवकर आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले..Farmer Debt Recovery: शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या १९ जिल्ह्यांमध्ये नोटीसा; कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा.गुरुवारी (ता. २) श्री क्षेत्र नारायणगडावर श्री. जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा झाला. व्यासपीठावर मठाधिपती शिवाजी महाराज, बंकटस्वामी मठाचे लक्ष्मण महाराज मेंगडे होते. खासदार बजरंग सोनवणे, आमदार सर्वश्री प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, अनिल जगताप, राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते..Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे सरकारला पुन्हा घेरण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांसाठीच्या मागण्यांमुळे सरकराचं टेन्शन वाढणार .जरांगे पाटील यांच्या मागण्या...पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा.राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७० हजार रुपये हेक्टरी द्या.ज्यांची नदीच्या कडेची शेती वाहून गेली आहे त्यांना १ लाख ३० हजार मदत द्या..शेतकरी आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी द्या.शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्या. त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.शेतीला नोकरीचा दर्जा द्या. जो १० एकरांच्या आत शेती करेल त्याला १० हजार रुपये महिन्याला द्या.पीकविम्याचे काढलेले ट्रिगर पुन्हा लागू करा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.