Farm Subsidy : भंडारा २०२५-२६ हंगामासाठी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा अधिवेशनात करण्यात आली होती. मात्र अनेक महिने उलटूनही शासनाकडून बोनसबाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे मागील वर्षीचे धान बोनस तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले..भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धान उत्पादनावर अवलंबून आहेत. नैसर्गिक संकटे, पिकांवरील रोग-किडींचा प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत..Farmer Issue: कर्जबाजारीपणाला कंटाळून द्राक्ष उत्पादकाची आत्महत्या.यंदा पावसाचे प्रमाणही सरासरीपेक्षा कमी राहिल्याने खरीप हंगामातील उत्पादनाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच धान पिकावर खोडकिडीसह विविध किडी व रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादन खर्चात वाढ होऊन अपेक्षित उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. .२०२४-२५ हंगामात शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा करून आर्थिक आधार दिला होता. त्याच धर्तीवर २०२५-२६ हंगामासाठीही बोनस देण्याचे आश्वासन अधिवेशनात देण्यात आले होते. मात्र, अद्याप बोनसची अधिकृत घोषणा झालेली नसल्याने जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ आणि पिकांवरील रोग-किडींच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे धान उत्पादकांना बोनसच्या माध्यमातून आर्थिक मदत देणे आवश्यक आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन बोनस जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे..Farmer Death: आत्महत्येनंतर मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात.अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, शहरप्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, उपतालुकाप्रमुख गुरुदेव साकुरे, उपशहरप्रमुख प्रकाश गभणे, राजेश ठवकर, विभागप्रमुख अनिरुद्ध गाढवे, नीतेश गभणे, क्रिष्णा नागपुरे, हिमांशू भाजीपाले, संतोष चांदेवार, रोशन दहेलकर, श्यामराव मालखंडाळे आणि नीलेश चामट उपस्थित होते..आंदोलनाचा इशाराधान बोनस तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा न केल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.