शरद पवार म्हणाले, राज्य सरकारने नुकतीच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी ही मदत त्यांना त्यांच्या पायावर पुन्हा उभे राहण्यासाठी पुरेसी नाहीशेतकरी सरकारवर नाराज आहेत.Sharad Pawar on farmers: अतिवृष्टीने मराठवाड्यात झालेले नुकसान मोठे आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आर्थिक मदत अपुरी आहे. यामुळे त्यांचे नुकसान भरून निघण्यास मदत होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी (दि.१७) बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.."आपत्ती येतच राहतात, पण बाधित शेतकऱ्यांना मदत करणे ही सत्तेत बसलेल्यांची जबाबदारी आहे. राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तीव्रता पाहता, शेतकऱ्यांची भावना आहे की ही मदत त्यांना त्यांच्या पायावर पुन्हा उभे राहण्यासाठी पुरेसी नाही. यामुळे ते सरकारवर नाराज आहेत," असे पवार यांनी म्हटले..Fadnavis Relief Package: फडणवीसांचे सरकारी पॅकेज म्हणजे फक्त आकड्यांची हेराफेरी .मला यावरुन कसलेही राजकारण करायचे नाही. पण मला खरोखरच असे वाटते की प्रत्येकाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी नमूद केले..Flood Relief Package: ‘पॅकेज’चा फोलपणा.वसुबारस साजरा न करण्याचा निर्णय "सरकार शेतकऱ्यांना पुरेशी मदत देत नाही. म्हणूनच आम्ही आजचा दिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे," असे शरद पवार आजच्या वसुबारसच्या पार्श्वभूमीवर म्हणाले. 'आज वसुबारस... गाई-वासराच्या करुणेची पूजा करण्याचा दिवस. या शुभदिनाच्या सदिच्छा व्यक्त करत असतानाच काही दिवसांपूर्वी पशुधनाचा धनी असलेल्या आपल्या शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटांचं, दावणीला जीव सोडावा लागलेल्या मुक्या पशुधनाचं ते दयनीय चित्र हे मनाला वेदना देत राहतं. पण याही दुःखातून बळीराजा सावरेल आणि नव्या ताकदीने त्याच्या आयुष्याची सुरुवात करेल, अशी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूयात, असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे..सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. गेल्या आठवड्यात, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे भरपाई पॅकेज जाहीर केले होते. त्यात पीक नुकसान, जीवित आणि मालमत्तेचे नुकसान, खरडून गेलेल्या जमिनीसाठी, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत, घरे, दुकाने आणि जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसान भरपाईचा समावेश होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.