Jalna News : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या गट आणि गणांची अंतिम प्रभाग रचना शुक्रवारी (ता.२२) घोषित करण्यात आली. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रंगत सुरू झाली आहे. अंतिम प्रभाग रचनेत एक गट आणि दोन गण वाढल्याने आता जिल्ह्यात परिषदेमध्ये ५७ सदस्य निवडून येणार आहेत. तर, गणांतून तब्बल ११४ सदस्य निवडून येणार आहेत. .जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली होती. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण ३५ हरकती आल्या होता. या ३५ हरकतींवर विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली. .Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार.त्यानंतर शुक्रवारी (ता.२२) जिल्हाधिकारी आशिमा मिलत्त यांनी जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची अंतिम प्रभार रचना घोषित केली आहे. यामध्ये हेलस गट वाढल्याने पूर्ण ५६ गट असलेली जिल्हा परिषद आता ५७ गटांची झाली आहे. .त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५७ सदस्य निवडून येणार आहेत. तर, पंचात समितीच्या दोन गणांमध्ये वाढ झाल्याने ११४ गण झाले आहेत. यामध्ये हेलस गट वाढल्याने हेलस आणि उमरखेडा हे गण वाढले आहेत..ZP Election 2025: पाच तालुक्यांतील गटांच्या संरचनेत बदल.एक गट उडाला, दुसरा आला अस्तित्त्वातघनसावंगीत तीर्थपुरी येथे नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतून तीर्थपुरी गट उडाला आहे. तीर्थपुरीच्या जागी जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग हा नवीन गट तयार झाला आहे.जिल्ह्यातील तालुकानिहाय गटजालना : ः देवमूर्ती, नेर, सेवली, पीरकल्याण, मौजपुरी, भाटेपुरी, रेवगाव, वाघ्रुळ जाहांगीर, रामनगर.भोकरदन : वालसावंगी, पारध बु., जळगाव सपकाळ, आन्वा, वालसा वडाळा, आव्हाना, सोयगावदेवी, नळनी बु., हसनाबाद, चांदई ठोंबरी, राजूरबदनापूर : ःबावणे पांगरी, गेवराई बाजार, शेलगाव, रोषनगाव, दाभाडी.जाफराबाद : ः जवखेडा ठेंग, वरूड बु, माहोरा, सिपोरा अंभोरा, टेंभुर्णी, अकोलादेव.मंठा ः तळणी, जयपुर, केंधळी, खोराड सावंगी, पांगरी गोसावी, हेलस.परतूर ः पाटोदा माव, वाटूर, कोकाटे हदगाव, सातोना खुर्द, आष्टी.घनसावंगी ः राणी उंचेगाव, गुरुपिंपरी, अंतरवाली टेंभी, रांजणी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, कुंभार पिंपळगाव, राजाटाकळी.अंबड ः रोहिलागड, धाकलगाव, साष्टपिंपळगाव, पारनेर, ताडहदगाव, पारनेर, जामखेड, गोंदी, शहागड..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.