Solapur News : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये एकूण ५ हजार २५८ मतदारांचा समावेश आहे. जिल्हा उपनिबंधक व निवडणूक अधिकारी किरण गायकवाड यांनी ही यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. १५० नावे वगळली असून, त्यात व्यापारी मतदारसंघातील १३३ तर हमाल-तोलार मतदारसंघातील १७ नावे आहेत..प्रारूप यादीत ५ हजार ४०८ मतदारांची नोंद होती. मात्र, त्यापैकी १५० नावे वगळण्यात आली आहेत. त्यात व्यापारी मतदारसंघातील १३३ तर हमाल-तोलार मतदारसंघातील १७ नावे आहेत. विविध हरकतींच्या सुनावणीअंती ही नावे वगळण्यात आली आहेत. .प्रारूप यादीत १६८४ नावे होती. त्यावर अनिल सावंत यांनी ७८८ आणि अजय बादगुडे यांनी ४९१ नावांवर हरकती घेतल्या होत्या. अंतिम यादीत १३३ नावे वगळली गेली असून, आता त्यापैकी एकूण १५५१ मतदार कायम आहेत. प्रारूप यादीत १०४२ नावे होती. प्रेम बगाडे आणि अजय भडकवाड यांनी ५१३ नावांवर हरकती घेतल्या होत्या..Solapur APMC Election : सोलापूर बाजार समितीसाठी चुरशीने मतदान; आज निकाल.त्यातून १७ नावे वगळली गेली असून १०२५ मतदारांची अंतिम यादी निश्चित झाली आहे. प्रारूप यादीतील १६४३ मतदार तसेच ग्रामपंचायत मतदारसंघातील १०३९ मतदार कायम ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही यादींवर हरकती असूनही त्या फेटाळण्यात आल्या. आता लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे..APMC Election : बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू .राजकीय रंगत वाढली, निवडणुकीकडे लक्षबार्शी बाजार समिती ही सोलापूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बाजार समिती आहे. जवळपास हजार कोटींची उलाढाल असलेल्या या समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. .ही निवडणूक स्थानिक राजकारणाला आर्थिक बळ देणारी मानली जाते. यंदा बार्शी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी बाजार समितीची निवडणूक होत असल्याने, आगामी राजकीय चित्राचाही वेध ही निवडणूक घेणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.