Maharashtra Sugar Mills Update: राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप केलेल्या उसाचा अंतिम साखर उतारा गुरुवारी (ता. १९) जाहीर करण्यात आला. एफआरपी देताना चालू हंगामातील उतारा गृहीत धरण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. उच्च न्यायालयाने हा आदेश रद्द केल्यामुळे मागील हंगामातील उताऱ्यांच्या आकडेवारीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते..एफआरपी काढण्याची पद्धत राज्य शासनाने गाळप हंगाम २०२१-२२ पासून बदलली. मागील हंगामातील साखर उताऱ्याऐवजी त्याच हंगामातील साखर उतारा विचारात घेत एफआरपी द्यावी, असा निर्णय राज्य शासनाने २१ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला होता..या वादग्रस्त निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हा शासन निर्णय रद्द केला. या निकालाविरोधात राज्य शासनाने आता सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिकेद्वारे दाद मागितली असून निकालाकडे साखर उद्योगाचे लक्ष लागून आहे..Sugar Sale Quota Violation: देशांतर्गत साखर विक्री कोट्याचे उल्लंघन सुरूच; केंद्राचा कारखान्यांवर आता कडक वॉच.दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने आधीचा शासन निर्णय रद्द केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. तसेच, एफआरपी अदा करण्यासाठी पूर्वीचीच कार्यपद्धत चालू ठेवण्याच्या सूचनादेखील साखर आयुक्तालयाला दिल्या आहेत. त्यानुसार आता, ‘मागील गाळप हंगामातील साखर उतारा आणि तोडणी वाहतूक खर्च विचारात घ्या व त्याप्रमाणेच एफआरपीचा पाक्षिक अहवाल सादर करा,’ असे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक साखर सहसंचालकांना साखर आयुक्तालयाने दिले आहेत..Sugar Mills Close: ऊसदराचा तिढा कायम! तोडगा निघेपर्यंत सोलापुरातील साखर कारखाने बंद.दुसऱ्या बाजूला साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा गेल्या हंगामातील अंतिम उतारा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात एकूण २१० साखर कारखान्यांचा २०२५-२६ मधील साखर उतारा देण्यात आला आहे. तसेच, बी हेवी किंवा उसाच्या रसामुळे साखर उताऱ्यात आलेली नेमकी घट आणि अंतिम साखर उताऱ्याची आकडेवारी देण्यात आली आहे..‘‘राज्यात उसाचा २०२६-२७ गाळप हंगाम सुरू आहे. त्यासाठी मागील वर्षातील कारखानानिहाय अंतिम साखर उताऱ्याचे आकडे महत्त्वाचे ठरतात. सभासदत्व असलेल्या कारखान्याचा उतारा किती आला आहे किंवा तुलनात्मकदृष्ट्या आजूबाजूच्या साखर कारखान्यांचा अंतिम साखर उतारा कसा आहे, याची माहिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे असणे गरजेचे ठरते,’’ असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले..राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील साखर उताऱ्याचा अंदाज येण्यासाठी तसेच साखर कारखान्यांना एफआरपीची परिगणना करण्यास साखर आयुक्तालयाने जाहीर केलेली अंतिम उतारा आकडेवारी उपयुक्त ठरेल.डॉ. संजय कोलते, साखर आयुक्त.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.