Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी २४१ उमदेवार निवडणूक रिंगणात आहेत. पंचायत समितींच्या १३६ जागांसाठी ४५५ उमदेवार निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांचे आव्हान कायम असल्याचे दिसून येत आहे. पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांतच बहुतांश ठिकाणी लढत होत आहेत. महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी सरळ लढत अपवादात्मकच होत आहे. .शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जनसुराज्यचे आमदार डॉ. विनय कोरे व काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड यांच्या आघाडी विरोधात ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रणवीर गायकवाड यांची स्थानिक आघाडी कार्यरत असली, तरी बहुतांशः ठिकाणी जनसुराज्य विरोधात ठाकरे शिवसेना अशा दुरंगी लढती आहेत..Local Body Elections: ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात.गडहिंग्लजमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत महागाव-भडगाव गटांत थेट लढत होत असून, उर्वरित चार गटांत तिरंगी, चौरंगी व पंचरंगी अशा बहुरंगी लढती होत आहेत. भाजपच्या विरोधात शरद पवार व अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व वंचित या तिन्ही पक्षांची आघाडी झाली असली, तरी काही गट व गणांतच त्यांचे उमेदवार रिंगणात आहेत..पन्हाळा तालुक्यात सोयीच्या आघाड्यांनुसार आमदार डॉ. विनय कोरे यांच्या जनसुराज्यचा सर्व पक्षांबरोबर सामना होणार आहे. करवीरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप युतीचे राहुल पी. एन. पाटील, विरुद्ध काँग्रेसचे आमदार सतेज पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. राधानगरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सर्वच ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले. हेच पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. .गगनबावड्यात आमदार सतेज पाटील यांच्या महाविकास आघाडीच्या विरोधात आमदार चंद्रदीप नरके व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांच्या महायुतीत चुरशीची दुरंगी लढत आहे. भुदरगडमध्ये पारंपरिक विरोधक पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांच्यात दुरंगी लढत रंगणार आहे, आजऱ्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप व शिवसेना शिंदे गट या महायुतीमधील तीनही घटक पक्षांनी एकमेकांना आव्हान दिल्याने रंगत वाढली आहे..Local Body Elections: २४७ उमेदवार निवडणूक रिंगणात .शिरोळमध्ये राजर्षि शाहू आघाडी, महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष यांच्यात लढत होणार असली, तरी भाजपला सर्वच मतदार संघांत उमेदवार देता आले नाहीत. यामुळे पहिली लढाई राजर्षि शाहू आघाडी व महाविकास आघाडीने जिंकली आहे..चंदगडमध्ये भाजपविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकीत एकत्र राहिलेल्या महाविकास आघाडीपैकी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाने तटस्थ भूमिका घेतली आहे. कागलमध्ये मुश्रीफ, समरजितसिंह व संजय घाटगे यांच्या विरोधात प्रा. मंडलिक यांनी शड्डू ठोकला आहे. हातकणंगलेत महायुती विरोधात महाविकास आघाडी लढत आहे..स्थानिक मुद्देच ठरणार प्रभावीप्रचारामध्ये स्थानिक मतदार संघांतील मुद्दे व उमेदवारांची निवडच महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून निवडणूक नसल्याने अनेक मतदार संघात जिल्हा परिषद, पंचायत समिती पातळीवर राजकीय शांतता होती. यामुळे या माध्यमातून केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवणे आव्हान ठरणार आहे. अनेक ठिकाणी नेते, गट यावरच निवडणूक रंगत आहे. आमदार पातळीवर केलेली कामे सांगत मत देण्याचे आवाहन केले जात आहे..शेती प्रश्नांवर प्रचार नाहीचही निवडणूक स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींच्या गटातच लढली जात आहे. पक्षांपेक्षा स्थानिक प्रश्नांवरील उखाळ्या पाखाळ्या हेच मुद्दे प्रचारात अग्रेसर ठरत आहेत. शेती, ग्रामविकास, शेतीपूरक उद्योग यावर अपवादात्मकच प्रचार होत असल्याचे चित्र आ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.