Ahilyanagar News: नोकरी, व्यवसाय करायचा असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे. उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर फी भरण्याची अनेक कुटुंबांची ऐपत नाही. त्यामुळे आरक्षण महत्त्वाचे आहे. शेतकरी, कष्टकरी कुटुंबे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशाच लोकांना आरक्षणाची खरी गरज आहे. शेतकरी हा कुणबी आहे आणि ते बहुतांश मराठा समाजातील आहेत. .म्हणून आमचा लढा केवळ मराठा समाजासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकरी, कष्टकरी कुटुंबांतील मुले-मुली उच्च शिक्षण घेऊन मोठी व्हावीत, त्यांच्या कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठीच आरक्षणाचा लढा सुरू आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत लढा थांबणार नाही, असे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी ‘अॅग्रोवन’ला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केले..Maratha Reservation : आरक्षणाचा प्रश्न सोडविल्याशिवाय आता माघार नाही.मराठा समाजाला कुणबीतून (ओबीसी) आरक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ते अहिल्यानगर येथे आले होते..श्री. जरांगे पाटील म्हणाले, की मुस्लिम, धनगर, समाजांच्या आरक्षणाच्या प्रश्नांसाठी लढा उभारणार आहे. सत्तेसाठी सरकारची बाजू ओढणाऱ्यांनी ती ओढावी, आम्ही समाजासाठी निःस्वार्थीपणे काम करत आहोत. आतापर्यंत केलेल्या संघर्षातूनच अर्ध्यापेक्षा अधिक मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळाले आहे. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी अधिकृत आहेत. सातारा, मुंबई व हैदराबाद गॅझेट लागू करून सर्व मराठा समाज कुणबी म्हणून आरक्षण मिळावे ही मुख्य मागणी आहे..Indian Agriculture Crisis : ...तरच भारताचा धाक निर्माण होईल.आता जातगणना होणार आहे. पण कशासाठी जरी जातगणना केली तरी आमचा फायदा होणार आहे. अधिक लोकसंख्या म्हणून आरक्षण देता येत नाही, असे कुठेही कायद्यात नाही. आरक्षणासाठी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे जे निकष आहेत, त्यात मराठा समाज बसत आहे. मुस्लिमांनाही आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यांना आरक्षण द्यायचे तर नाही, उलट त्यांना कारण नसताना त्रास द्यायचा ही सरकारची भूमिका आहे. यामुळे एकात्मतेला धोका पोहोचत आहे. काही लोक समाजात वाद लावून द्वेष करत आहेत..मराठा नेते खंत व्यक्त करतातमनोज जरांगे पाटील म्हणाले, की मराठा समाजाचे सत्ताधारी पक्षात नुकसान होत आहे. त्यांना तेथे त्रास होत आहे. तशी खंत राज्यातील ३० पेक्षा अधिक नेत्यांनी आपल्याकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे नेते नसले तरी त्यांचे कार्यकर्ते, लोक आमच्याबरोबर आंदोलनात असतील. हे नेतेच त्यासाठी रसद पुरवतील. त्रास होत असलेले नेते म्हणाले तर आम्ही त्यांची नावेही जाहीर करू..‘कायद्यात दुरुस्ती झाली हा विजय’श्री. जरांगे पाटील म्हणाले, ‘‘ वर्षभरापूर्वी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला गेलो होतो. काहीच न मिळता परत आल्याची टीका जाणीवपूर्वक होतेय, मात्र सहज माघारी आलेलो नाहीत. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात जायचे असेल तर आधी कायद्यात दुरुस्ती होणे गरजेचे होते. त्या वेळी कायद्यात दुरुस्ती केली. त्याची प्रक्रिया आहे..दुरुस्ती करून पुढील अंमलबजावणीसाठी वेळ देणे गरजेचे आहे. आता अंमलबजावणी झाली नाही ही फसवणूक आहे, मात्र त्या वेळी कायद्यात दुरुस्ती करून परत आलो हाच विजय आहे. विनाकारण दुसऱ्यांना बदनाम करू नये. आमच्यावर टीका करता, तुम्ही मात्र चाळीस-पन्नास वर्षे लोकांना मूर्ख बनवले आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.