Fig Farmers: अंजिराच्या आंबिया बहरासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा, अधिसूचित तालुका, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. संबंधित विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत नोंदवलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. अंजीर पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल. .समाविष्ट जिल्हे : पुणे, छत्रपती संभाजीनगर योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२६ गारपिटीपासून नुकसान झाल्यास नुकसानीची घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस नुकसानीची सूचना देणे आवश्यक आहे. (केंद्र शासन हेल्पलाइन १४४४७).Fig Crop Insurance Scheme: अंजीर पिकासाठी विमा योजना.शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता साधारण विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के मर्यादेत रु. ८००० प्रती हेक्टर. नियमितसाठी आणि गारपिटीसाठी रु. २६५० प्रति हेक्टर. (विमा हप्ता ३५ टक्यांपेक्षा जास्त असल्यास शेतकऱ्यांनी भरायचा विमा हप्ता मध्ये वाढ असेल ).शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे बंधनकारक आहे. मृग बहर २०२६ मध्ये अंजीर पीक विमा घेतलेल्या विमा अर्जदार यांना पुन्हा आंबिया बहरामध्ये अंजिरासाठी विमा योजनेत सहभाग घेता येणार नाही. पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. .बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जीओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील..Fruit Crop Insurance Scheme: आंबिया बहरासाठी फळपिकासाठी विमा योजना.विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसुल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे..शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते . यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा..शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा. शेतकऱ्यांना डिजिटल क्रॉप सर्व्हे बंधनकारक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज केव्हाही रद्द होऊ शकतो..एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक अधिसूचित फळपिके असल्यास तो या सर्व पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेवू शकतो..योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हे. मर्यादेपर्यंत राहील..विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी लिंक असावे ..शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.inशेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपीक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना पुढील ५ वर्षे कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार नाही. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी १४४४७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.(लेखक कृषी आयुक्तालयामध्ये कृषी संचालक (नियोजन वप्रक्रिया) आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.