Yavatmal News : जून, जुलैमध्ये १२ ते १८ रुपये किलोवर असलेले केळीचे दर सध्या सात रुपयांवर आले आहेत. सण, उत्सवाच्या काळात केळीला मागणी राहत दरात तेजीची अपेक्षा असताना व्यापाऱ्यांनी लॉबी करीत दर पाडण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप होत आहे. .विदर्भात नगदी पीक म्हणून शेतकरी केळीकडे वळत आहेत. केळीखालील क्षेत्रात वाढीच्या परिणामी अंजनगावसूर्जी परिसरात बोर्डच्या माध्यमातून केळीचे दरही जाहीर होतात. मध्य प्रदेशातील बऱ्हानपूर तसेच जळगाव व इतर भागांतील केळी दराचा अंदाज घेत कमीतकमी दर देण्यावर या भागातील व्यापाऱ्यांचा भर राहतो, अशी चर्चा आहे. .Banana Farming : दर्जेदार घड निर्मितीसाठी केळीत रोग व्यवस्थापन महत्त्वाचे.त्यानुसार आता बऱ्हानपूर भागातील दर विचारात घेऊन केळीला दर दिला जात असल्याचे सांगितले जाते. जून, जुलैमध्ये केळीचे दर १२ ते १८ रुपये किलोवर होते. हे दर मंगळवारी (ता. २) थेट सात रुपयांवर आले. .त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. केळीचा उत्पादकता खर्च एकरी किमान सव्वा ते दीड लाख रुपये आहे. त्याची भरपाई देखील यंदा शक्य नसल्याची स्थिती आहे..पाच टन मालाची कमी दरात विक्रीजून, जुलै महिन्यात दर तेजीत असताना कळंब येथील निखिल देशकर यांना साडेतीन हजार झाडांवरील केळींची १३ ते १४ लाख रुपयांत मागणी करण्यात आली होती. परंतु सण, उत्सवात मागणी आणि दर वाढतील या अपेक्षेने त्यांनी वाट पाहण्याचा निर्णय घेतला. आता मात्र दरातील घसरणीमुळे त्यांना नुकसान सोसावे लागत आहे. पर्याय नसल्याने पाच टन मालाची विक्री कमी दराने करावी लागली, असे श्री. देशकर यांनी सांगितले..Banana Rate: केळी दर नीचांकी स्थितीत.पांढरकवडा तालुक्यातही लागवडखैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा) भागात २५ एकरांवर केळी लागवड आहे. पाच बाय पाच फूट लागवड अंतरानुसार १७५० झाडे बसतात. त्यानुसार ३० ते ४० हजारांवर झाडे आहेत. गेल्या मे महिन्यातील लागवड केलेला प्लॉट फेब्रुवारी-मार्चमध्ये काढणीला आला तर यंदा जुलैतील लागवड असलेल्या केळीची काढणी पुढील वर्षी जूनमध्ये होईल. सध्या बाराही महिने फळांना मागणी राहते. त्यानुसार लागवड व काढणीच्या नियोजनावर भर दिल्याचे शेतकरी प्रकाश पुप्पलवार यांनी सांगितले.\.१० ऑक्टोबर २०२४ मध्ये लागवड केली. सण, उत्सव काळात केळीची उपलब्धता व्हावी असा उद्देश त्यामागे होता. व्यापाऱ्यांकडून आता सात रुपये किलोने मागणी होत आहे. याउलट घाऊक व्यापारी ५०० रुपये क्रेटने किरकोळ व्यापाऱ्यांना केळीची विक्री करत असून ६० रुपये डझनने किरकोळ व्यापारी केळी विकत आहेत. शेतकऱ्यांना कमी दर मिळावा याकरिता लॉबी केली आहे.- निखिल देशकर, दोनोडा, ता. कळंब, यवतमाळ.सफरचंदाचे दर गडगडत ६० रुपये किलोवर आले आहेत. यावरूनच फळ दरातील घसरणीचा अंदाज येतो. केळीची आवक वाढली आणि मागणी कमी या स्थितीमुळे दर दबावात आले आहेत. यामागे कोणतीच लॉबी किंवा षडयंत्र असण्याचे कारण नाही. - नरेंद्र धुळे, व्यापारी, अंजनगावसूर्जी, अमरावती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.